मराठी कलाकारांचा मराठीतील पहिला ‘माईम थ्रू टाईम’ कार व्हिडिओ

विनय देशमुख
मंगळवार, 20 मार्च 2018

‘माईम थ्रू टाईम’ कार व्हिडिओ मध्ये आपल्याला मराठी सिनेतारका नम्रता गायकवाड, सेन्हा चव्हाण, चारु दिसले दिसणार आहेत. अतिशय सुंदर आणि देखण्या अदाकारांनी त्यांनी ही संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओची खासियत म्हणजे या संपूर्ण गाण्यामध्ये या तिन्ही अभिनेत्रींचे १७ वेगवेगळे लूक्स आहेत.

‘माईम थ्रू टाईम’ कार व्हिडिओ ही संकल्पना हिंदी, पंजाबी, मल्याळी, तेलगू, इंग्रजी बऱ्याच भाषेतील गाण्यामधून जगप्रसिद्ध आहे. या वेगळ्या कॉन्सेप्टला मराठी कलाकारांनी मराठी मध्ये पाडव्यानिमित्ताने आणली आहे. मराठी कलाकारांचा मराठीतील पहिला “माईम थ्रू टाईम” कार व्हिडिओ आहे. पाडव्यानिमित्त काहीतरी मजेदार व्हिडिओ जो आपल्या मराठी सिनेसृष्टीसाठी असेल आणि असा माईम थ्रू टाईम व्हिडिओ आजपर्यंत मराठीतून झाला नव्ह्ता. संकल्पनेतून याची ‘मुखवटे ए.सी.जे.एन’ यांनी निर्मिती केली आहे. आजची नवीन पिढी यूट्यूबवर वेबसिरीज, प्रॅन्क, इंटरेस्टिंग स्टोरीज फॉलो करताना दिसतात त्यामुळे, युट्युबचा रिच हा प्रचंड प्रमाणात आहे. म्हणूनच आता हा व्हिडिओदेखील नव्या पीढीसाठी पर्वणीच ठरेल.    

‘माईम थ्रू टाईम’ कार व्हिडिओ मध्ये आपल्याला मराठी सिनेतारका नम्रता गायकवाड, सेन्हा चव्हाण, चारु दिसले दिसणार आहेत. अतिशय सुंदर आणि देखण्या अदाकारांनी त्यांनी ही संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओची खासियत म्हणजे या संपूर्ण गाण्यामध्ये या तिन्ही अभिनेत्रींचे १७ वेगवेगळे लूक्स आहेत. एकूण पंधरा गाणी एकत्र असून या चार ते पाच मिनिटांच्या गाण्यात ५१ वेगवेगळे पेहराव आहेत. अगदी ऎरणीच्या देवा तुला ते झिंगाट डान्स, दुनियादारी, नवीन पोपट हा, लय भारी अशी मराठीतील लोकांना क्रेझ लावणारी गाणी आणि त्यांच्या अदा यामध्ये पाहायला मिळणार आहेत. या वेगळ्या संकल्पनेनुसार एका कार मध्ये या सगळ्या गोष्टी करण्याची पहिली वेळ असल्यामुळे आमच्या संपूर्ण टिमने प्रचंड मेहनत केली असे या व्हिडिओचे दिग्दर्शक विनय प्रतापराव देशमुख यांनी सांगितले. 

विनय देशमुखला एक उत्तम कलाकार म्हणून तर आपण यापूर्वी विविध सिरीयल मधून पाहिले हे तो आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्ममधील विजेता असलेला एक उत्तम अभिनेता आहे. आपल्या अभिनयाने मन जिंकणारा विनय देशमुख ‘माईम थ्रू टाईम’ कार व्हिडिओमुळे त्याच्यातील एक उत्तम दिग्दर्शकही पाहायला मिळाला आहे. तसेच सागर जाधव यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. डि. ओ. पी दशरथ शेळके तर असिस्टंस डि. ओ. पी प्रतीक खडे हे आहेत. मराठी कलाकारांचा हा पहिला प्रयत्न नक्कीच सगळ्यांना आवडेल.

Web Title: entertainment news vinay deshmukh mime through time video

व्हिडीओ गॅलरी