शाहिदने सोडले घर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

ऐकून धक्का बसला, हो ना ! खरंय. शाहिदने घर सोडलंय; पण ते काहीच दिवसांसाठी. तो सध्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहतोय. अभिनेते आपल्या चित्रपटाच्या तयारीसाठी खूप मेहनत घेतात. त्यातलाच हा प्रकार. सध्या शाहिद संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाचा सेट गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये लागला आहे. दिवस रात्र शाहिदला चित्रीकरण करावं लागत आहे. रात्री उशिरा घरी जाऊन त्याला सकाळी लवकर सेटवर पोहोचावं लागतं. त्याच्या घरापासून फिल्मसिटीला जायला चार तास जातात.

ऐकून धक्का बसला, हो ना ! खरंय. शाहिदने घर सोडलंय; पण ते काहीच दिवसांसाठी. तो सध्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहतोय. अभिनेते आपल्या चित्रपटाच्या तयारीसाठी खूप मेहनत घेतात. त्यातलाच हा प्रकार. सध्या शाहिद संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाचा सेट गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये लागला आहे. दिवस रात्र शाहिदला चित्रीकरण करावं लागत आहे. रात्री उशिरा घरी जाऊन त्याला सकाळी लवकर सेटवर पोहोचावं लागतं. त्याच्या घरापासून फिल्मसिटीला जायला चार तास जातात. त्यामुळे त्याने गोरेगावमधीलच एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काही दिवसांसाठी शिफ्ट होण्याचे ठरवले. तो ‘पद्मावती’ या चित्रपटात राजा रावल रतन सिंग या योद्ध्याची भूमिका करतोय. त्यामुळे त्याला फिट राहणेही क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्याला जिममध्येही बराच वेळ द्यावा लागतो. हॉटेलमध्ये शिफ्ट झाल्याने त्याचा हा वेळ वाचत आहे. या चित्रपटातीलदीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही फिल्मसिटीजवळच घर घेतल्याचे समजतेय.

Web Title: entertainment shahid kapoor release home