.. तर सिनेमागृहे बेमुदत बंद!

टीम ई सकाळ
शनिवार, 1 जुलै 2017

जीएसटी बाबत ऑल इंडिया थिएटर ओनर्स असोसिएशन​ कडून काहीच परिपत्रक न आल्याने या गोंधळात भर पडली आहे. जीएसटी सह जर काही स्थानिक कर आम्हाला लागले तर आम्ही थिएटर बंद ठेऊ अशी भूमिका मोहोळ यांनी घेतली.

पुणे- एक जुलै पासून भारतात जीएसटी लागू झाला असला तरी अनेक क्षेत्रामध्ये याबाबत कमालीचा गोंधळ आहे. सांस्कृतिक क्षेत्र ही याला अपवाद नाही. 100 रुपये व त्यावरील तिकिटाबाबत नेमका जीआर हाती न आल्याने सिनेमा थिएटर मालक गोंधळले आहेत.

याबाबत शनिवारी पुण्यातील थिएटर मालकांची बैठक झाली. यावर आणखी 5 दिवस निरीक्षण करून निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत बोलताना पुणे थिएटर ओनर्स (एगझिबिटर्स) असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मोहोळ म्हणाले, जीएसटीचा जीआर अद्याप जिल्हाधिकाऱ्यांना मिळलेला नाही. तो आमच्या हाती आलेला नाही. 100 रुपये व त्यावरील तिकिटावर 18 टक्के व 200 रुपयांवर 28 टक्के कर असल्याचे कळते. सध्या तरी पुण्यातील काही थिएटर 90 रुपये तर काही 100 रुपये दर लावतील. 5 दिवस काय परिस्थिती होते हे पाहून पुढे निर्णय घेतला जाईल.

जीएसटी बाबत ऑल इंडिया थिएटर ओनर्स असोसिएशन​ कडून काहीच परिपत्रक न आल्याने या गोंधळात भर पडली आहे. जीएसटी सह जर काही स्थानिक कर आम्हाला लागले तर आम्ही थिएटर बंद ठेऊ अशी भूमिका मोहोळ यांनी घेतली. आजच्या बैठकीत यावर एकमत झाल्याची माहिती त्यांनी दिली. आज झालेल्या बैठकीचा तपशील ऑल इंडिया थिएटर ओनर्स असोसिएशन​कडे पाठवण्यात येणार आहे.

Web Title: esakal news entertainment news pune news GST theaters cinema