Evelyn Sharma Baby Boy: 'ये जवानी है दिवानी' फेम एवलिना दुसऱ्यांदा झाली आई!

टीव्ही मनोरंजन विश्वात एवलिना ही नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. एवलिननं आता दुसऱ्यांदा गुड न्युज दिली आहे.
Evelyn Sharma Baby Boy
Evelyn Sharma Baby Boy
Updated on

Evelyn Sharma Baby Boy : ज्यांनी रणबीर आणि दीपिकाचा ये जवानी है दिवानी नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना एविलिना कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्या चित्रपटातून ती पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली होती. भलेही तिच्या वाट्याला छोटीशी भूमिका असेल मात्र त्यात ती चमकून गेली होती. त्या भूमिकेचे कौतूक झाले होते. आता एवलिना सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वात एवलिना ही नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. एवलिननं आता दुसऱ्यांदा गुड न्युज दिली आहे. तिनं मुलाला जन्म दिला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर शेयर करत तिनं चाहत्यांना आपली ही गोड बातमी दिली आहे. एवलिननं २०२१ मध्ये लग्न केलं होतं. त्याच वर्षी तिनं नोव्हेंबरमध्ये एका मुलीला जन्म दिला होता. आता सोशल मीडियावर एवलिननं तिच्या मुलाचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

Evelyn Sharma Baby Boy
Shah Rukh Khan : राजकुमार हिरानीच्या चित्रपटात यापूर्वी शाहरुख का नव्हता?

एवलिनच्या त्या फोटोंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. रणवीर कपूर सोबत एवलिना पहिल्यांदा ये जवानी है दिवानीमध्ये दिसली होती. एवलिननं थोड्यावेळापूर्वी बाळासोबत फोटो शेयर केला आहे. एवलिनच्या मुलीचं नाव एवा असे आहे.

Evelyn Sharma Baby Boy
Bollywood Copy Song : चोरटं बॉलीवूड, ती गाजलेली '१०' गाणी पाकिस्तानची चोरलेली!

एवलिननं १५ मे २०२१ रोजी तुषान भिंडीसोबत लग्न केले होते. कुणालाही न सांगता, जास्त गाजावाजा न करता एवलिनानं लग्न केलं होतं. त्यावेळी तिच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. आता ती एका राजकुमाराची आई झाली आहे. तिनं इंस्टावर फोटो पोस्ट केले असून त्यावरुन नेटकऱ्यांनी तिचं अभिनंदन करुन तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.