esakal | बॉलीवूडमधील 25 हजार कामगारांच्या बॅंक खात्यात 'भाईजानचे' पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

Salman khan

बॉलीवूडमधील 25 हजार कामगारांच्या बॅंक खात्यात 'भाईजान'चे पैसे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बॉलिवूडमधील अनेक कामगारांचे ( Bollywood workers) मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या कामगारांसाठी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman khan) मदतीचा हात पुढे केला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये सलमानने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित हजारो कामगारांना आर्थिक मदत केली होती. आता कोरोनाच्या दुसर्‍यामुळे कामगारांना पुन्हा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सलमानने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार कामगारांना मदत करण्याची घोषणा केली आहे. चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या लाईटमॅन, स्पॉटबॉय, मेक-अप आर्टिस्ट, स्टंटमॅन, ज्युनियर आर्टिस्ट यांना सलमान आर्थिक मदत करणार आहे. (Salman khan to help 25000 bollywood workers by giving money to their bank account)

सलमानच्या या मदत कार्याची माहिती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी एका मुलाखतीमध्ये दिली. सलमानने 25 हजार कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण 3.75 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान त्याच्या ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ या संस्थेमार्फत नेहमीच गरजु लोकांची मदत करत असतो. याआधी सलमानने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित 23 हजार लोकांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्यानंतर त्याने दोन वेळा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली. अशाप्रकारे सलमानने गेल्या वर्षी इंडस्ट्रीशी संबंधित गरजू लोकांना 15 कोटींची आर्थिक मदत केली होती.

सलमानने कोरोना काळात केलेल्या या मदत कार्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. नुकतीच सलमानने त्याच्या ‘राधे’ चित्रपटासंबंधीत मोठी घोषणा केली होती. सलमानने राधे चित्रपटामधून होणारी सर्व कमाई कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: 'चाळीस वर्ष दिली साथ, कोरोनानं शेवटी घात केलाच'

हेही वाचा: 'मला चांगली ट्रीटमेंट मिळाली नाही', मरण्यापूर्वी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

तसेच काही दिवसांपुर्वी सलमानने मुंबईमधील फ्रंटलाईन वर्कर्ससाठी नाश्ता आणि जेवणाची देखील व्यवस्था केली होती. यावेळी हे फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांची चव सलमानने स्वत: चाखली होती.