रणबीर आलियाच्या लग्नाची ती पत्रिका खोटी

रणबीर आलियाच्या लग्नाची ती पत्रिका खोटी

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमप्रकरणाची सर्व बॉलिवूडमध्ये चर्चा असते. चाहत्यांमध्येही त्यांचे लग्न कधी होईल याविषयी उत्सुकता आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नाची खोटी पत्रिका सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

परंतु आलियाची आई सोनी राजदानने आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेबाबतच्या ती पत्रिका खोटी असल्याचं म्हटलं आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नाची जी पत्रिका वायरल होत आहे. त्यात त्याच्या लग्नाची तारिख 22 जानेवारी 2020 अशी लिहिली आहे. याखेरिज कपूर कुटूंबातील आणि भट्ट  कुटूंबातील सदस्यांचीही त्यात नावं आहेत. 

विशेष म्हणजे हे लग्न उमेद भवन जोधपूर येथे होणार असल्याचं पत्रिकेत म्हटलं आहे. जोधपूर भवनात अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोन्सचं लग्न झालं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com