esakal | 'नाव संतोष आनंद, मात्र आयुष्यभर दु:खचं वाट्याला आलं'
sakal

बोलून बातमी शोधा

famous lyricists famous lyricist Santosh Anand Bollywood journey through his struggles

1970 मध्ये हा चित्रपट आला होता. त्यात मी पूरबा सुहानी आई रे हे गाणे मी लिहिले होते.

'नाव संतोष आनंद, मात्र आयुष्यभर दु:खचं वाट्याला आलं'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  सत्तरीच्या दशकात आपल्या गीतांनी प्रेक्षकांना वेड लावणा-या गीतकाराचा संघर्ष मोठा म्हणावा लागेल. त्या गीतकाराचे नाव संतोष आनंद असे आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इंडियन आयडॉलमधील परिक्षक आणि प्रसिध्द गायिका नेहा कक्करनं त्यांना पाच लाख रुपयांची मदत केली. त्यानंतर त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते. आता अनेकांना त्यांचे नावही माहिती नाही. बॉलीवूडमध्ये त्यांचे असणारे योगदान याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आजही त्यांनी लिहिलेली कित्येक गाणी लोकं गुणगुणत असतात.

संगीताच्या दुनियेत आता संतोष आनंद कुठेसे हरवून गेले आहेत. त्यांच्यापुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. प्रख्यात गीतकार म्हणून ते प्रसिध्द आहेत. मात्र आजच्या पिढीला त्यांच्याविषयी फारशी माहिती नाही. 5 मार्च 1940 मध्ये सिकंदराबाद याठिकाणी त्यांचा जन्म झाला. मध्यम वर्गीय कुटूंबात जन्माला आलेले आनंद यांचे पूर्ण नाव संतोष कुमार मिश्र असे आहे. शिक्षणानंतर ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. त्यानंतर त्यांचा गीतकार म्हणून या शहरात प्रवास सुरु झाला. अनेक ठिकाणी त्यांनी नोकरीच्या शोधात ते भटकले. मात्र यश काही आले नाही.

आपल्या प्रवासाविषयी संतोष आनंद सांगतात की, मी अभिनेता मनोज कुमार यांचा आभारी आहे की त्यांनी माझ्यातील कलेला ओळखले. आणि मला त्यांच्या पूरब और पश्चिम चित्रपटासाठी संधी दिली. 1970 मध्ये हा चित्रपट आला होता. त्यात मी पूरबा सुहानी आई रे हे गाणे मी लिहिले होते. त्यानंतर मनोज यांनी मला अनेक चित्रपटांतून गीतलेखनाची संधी दिली. ती मी स्वीकारली आणि काम करत गेलो. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये मी गीतलेखन केले आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराच्या सहवासात काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.

'मामी, एवढी पेट्रोलवाढ झाली हे काय बरं नाही' 

एका हि-याची पारख त्या जवाहिरालाच असते. त्याप्रमाणेच मला राज कपूर यांचेही उदाहरण देता येईल. त्यांनीही माझ्याकडून अनेक गीत लिहून घेतले. जी गीतं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि लोकप्रिय झाली. प्रेमरोगी सारख्या चित्रपटांचा त्यात उल्लेख करता येईल. माझे नाव जरी संतोष असले तरी प्रत्यक्षात माझ्या वाट्याला कधी संतोष वा आनंद आला नाही. तरुण असताना एका अपघातात माझे पाय गेले. आणि मी अपंग झालो. त्यामुळे माझे जीवन फार कष्टप्रद झाले. मला दोन मुले होती. एकाचे नाव संकल्प आनंद आणि एक मुलगी शैलजा आनंद, सुनेचे नाव नंदनी होते. दहा वर्षानंतर त्यांना अनेक नवस करुन मुलबाळ झाले होते.

याला म्हणतात खरा चाहता; सोनू सूदसाठी चालवली 2000 किमी सायकल

संकल्प हा गृह मंत्रालय विभागात एका मोठ्या हुद्दयावर होता. त्यानं मला न सांगता लग्न केले होते. त्याता संतोष आनंद यांना धक्का बसला होता. 2014 मध्ये संकल्प आनंद याने त्याच्या पत्नीसह आत्महत्या केली होती. 
 

loading image