esakal | झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

zee marathi serials

जाणून घ्या, केव्हा प्रसारित होणार या मालिकेचा शेवटचा एपिसोड?

झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

उत्तम कथानक, त्यातील कलाकारांचं दमदार अभिनय आणि कथेतील रंजक वळण या गोष्टींमुळे एखादी मालिका लोकप्रिय ठरते. काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मग त्यातील काही कलाकार बदलले तरी त्याच्या लोकप्रियतेत तसूभरही कमी होत नाही. मात्र आता झी मराठी वाहिनीवरील अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी आता नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका आहे 'माझ्या नवऱ्याची बायको'.

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं, असं म्हणत जवळपास चार वर्षांपूर्वी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. आजवर या मालिकेने टीआरपीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. मात्र आता ही मालिका शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. येत्या ७ मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी 'घेतला वसा टाकू नको' ही नवी मालिका सुरू होणार आहे. 

हेही वाचा : "पूजा माझी मुलगी नसती तर तिच्यासोबत लग्न केलं असतं"; महेश भट्ट यांनी का केलं होतं ते विधान?

झी मराठी वाहिनीवर आणखी एक लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचा तिसरा भाग लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित झाला असून त्याला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे.