esakal | "पूजा माझी मुलगी नसती तर तिच्यासोबत लग्न केलं असतं"; महेश भट्ट यांनी का केलं होतं ते विधान?
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh bhatt and pooja bhatt

महेश भट्ट यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा येऊ लागल्या होत्या. 

"पूजा माझी मुलगी नसती तर तिच्यासोबत लग्न केलं असतं"; महेश भट्ट यांनी का केलं होतं ते विधान?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत राहिले आहेत. मात्र त्यांचा सर्वाधिक चर्चेत राहिलेला वाद म्हणजे मुलगी पूजा भट्ट हिच्यासोबत एका मासिकासाठी केलेलं शूट. या फोटोशूटमुळे कलाविश्वात व सर्वसामान्यांत एकच खळबळ माजली होती. तो वाद शमत नव्हता तितक्यात महेश भट्ट यांनी मुलीबाबतच वादग्रस्त विधान केलं होतं. 

काय होत प्रकरण?
महेश भट्ट यांनी मुलगी व अभिनेत्री पूजा भट्ट हिच्यासोबत एका मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये हे दोघं लिप टू लिप किसिंग करताना दिसतात. हा फोटो प्रसिद्ध होताच मोठा वाद निर्माण झाला. सर्वसामान्यांकडून, चाहत्यांकडून दोघांवर जोरदार टीका होऊ लागली होती. इतकंच नव्हे तर महेश भट्ट यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा येऊ लागल्या होत्या. 

हेही वाचा : करीनाच्या मुलाचा पहिला फोटो आला समोर; तुम्ही पाहिलात का?

हेही वाचा : दोन मुलं झाल्यानंतरही इतकी फिट कशी? शाहिदच्या पत्नीने सांगितलं सिक्रेट
 

महेश भट्ट यांचं पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान
वाद दिवसेंदिवस मोठा होऊ लागला तेव्हा महेश भट्ट यांनी एक पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेमुळे वाद थंडावला नाही तर तो आणखी चिघळला. कारण या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की, जर पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केलं असतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर हा वाद आणखीनच टोकाला पोहोचला. अखेर त्यांनी सारवासारव करत नैराश्याचं कारण दिलं. सर्व बाजूंनी होणारे आरोप, जीवे मारण्याच्या धमक्या या सर्व गोष्टींमुळे मी नैराश्यात गेलो होतो आणि म्हणूनच माझ्याकडून ते विधान चुकून गेलं, असं स्पष्टीकरण महेश भट्ट यांनी दिलं होतं.