सुनिल शेट्टी 'गुटखा किंग'! ट्वीटरवर रंगली चर्चा,काय आहे प्रकरण? Suniel Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suniel Shetty 'gutka king' ?

सुनिल शेट्टी 'गुटखा किंग'! ट्वीटरवर रंगली चर्चा,काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार(Akshay Kumar),शाहरुख खान,आणि अजय देवगणला तंबाखू ब्रॅंडच्या उत्पादनाची जाहिरात केल्याप्रकरणी खूप ट्रोल करण्यात आलं होतं. लोकांनी अक्षय कुमारला तर भलतंच धारेवर धरलं होतं. यामुळे अक्षयला चक्क सोशल मीडियावर माफी देखील मागावी लागली होती. इतकंच नाही तर जाहिरातीलाही त्यानं रामराम ठोकला होता. या प्रकरणावर अद्यापही ट्वीटरवर चर्चा रंगलेली दिसून येते अधनं मधनं. एका नेटकऱ्यानं रस्त्याच्या कडेला लागलेल्या एका होर्डिंगचा फोटो काढून तो अक्षय,शाहरुख आणि अजयला टॅग करत त्यांच्यावर निशाणा साधला. पण या नेटकऱ्याकडून एक चूक झाली. त्यानं अजय देवगण ऐवजी हा फोटो सुनिल शेट्टीला(Suniel Shetty) टॅग केला आहे. पण यानंतर सुनिल शेट्टी मात्र खवळलेला दिसून आला. त्यानं त्या नेटकऱ्याला कडक शब्दात पलटवार केला आहे. आणि त्यानंतर मात्र त्या नेटकऱ्याला बॉलीवूडच्या या 'अण्णा'ची माफी मागावी लागली.

Sunil Shetty reply on twitter

Sunil Shetty reply on twitter

काय आहे प्रकरण?

त्याचं झालं असं की,ट्वीटरवर एका नेटकऱ्यानं त्या होर्डिंगचा फोटो ट्वीट केला,ज्यामध्ये तंबाखू उत्पादन कंपनीच्या जाहिरातीत अक्षय कुमार,अजय देवगण,शाहरुख खान यांचा फोटो छापलेला आहे. या फोटोला शेअर करीत त्यांनी लिहिलं आहे,''इतक्या जाहिराती पाहिल्या या हायवे वर आता तंबाखू खावासा वाटत आहे''. आणि त्या नेटकऱ्यानं चुकून सुनील शेट्टीला देखील हे ट्वीट टॅग केलं आहे. आणि पुढे लिहिलं आहे,'हैलो #GutkaKingsofIndia. ''शाहरुख,अक्षय,सुनील तुम्हाला लाज वाटली पाहिजे, चुकीच्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य देत आहात,चुकीच्या मार्गावर तरुणांना नेत आहात. मुर्खांनो,भारताला कॅन्सरच्या मार्गावर का घेऊन जाताय?''

या ट्वीटला पाहिल्यानंतर सुनील शेट्टीनं त्या नेटकऱ्याला कडक शब्दात पलटवार केला आहे. त्यानं लिहिलं आहे,''भावा,तू तुझा चष्म्याचा नंबर नीट चेक कर. किंवा चष्मा बदलून टाक''. आणि यासोबत सुनीलनं हाथ जोडलेला इमोजी देखील पोस्ट केला आहे. यावर लगेचच त्या नेटकऱ्यानं मात्र सुनील शेट्टीला चुकीचा फोटो टॅग केल्यानं माफी मागितली आहे. अजय देवगण ऐवजी नेटकऱ्यानं तो फोटो सुनील शेट्टीला टॅग केल्यानं त्यानं, 'चुकी झाली,माफ करा ,तुम्हाला दुखवायचा माझा हेतू नव्हता', असं म्हटलं आहे. म'ला अजय देवगणला तो फोटो टॅग करायचा होता. मी तुमचा फॅन आहे सुनिलजी. त्यामुळे टॅगलिस्ट मध्ये तुमचं नाव सर्वात वरती आलं,आणि चुक घडली'. त्या नेटकऱ्यानं देखील हात जोडणारा इमोजी पोस्ट केला आहे.

हेही वाचा: 'हिंदी सिनेमा म्हणजे वेळ वाया घालवणं कारण...' महेश बाबूची तिखट प्रतिक्रिया

तंबाखू उत्पादनाची कुठलीच जाहिरात सुनिल शेट्टीनं आतापर्यंत केली नाही यासाठी त्याचं त्या चाहत्यानं कौतूकही केलं. अनेक नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी लिहिलंय,'यासाठीच सुनिल तुला एक चांगला माणूस म्हटलं जातं. चाहत्यानं चुकून केलं तरी त्यावर तु प्रतिक्रिया दिलीस'. तर कुणी मजेनं लिहिलंय,'हे तर आम आणि श्याम मधलं कन्फ्यूजन झालं आणि बाबू भैय्यावालं काम केलं गेलं'.

हेही वाचा: बॉलीवूड पदार्पणावर शहनाझनं तोडली चुप्पी, उत्तरानं वाढवला गुंता अन् उत्सुकता

सुनील शेट्टी सध्या चर्चेत आहे तो मुलगी अभिनेत्री आथिया शेट्टीच्या क्रिकेटर के.एल.राहूल सोबतच्या रीलेशनमुळे आणि तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे. बोललं जात आहे ,डिसेंबर २०२२ मध्ये आलिया आणि के.एल.राहूल लग्न करणार आहेत. पण यात काही तथ्य नसल्याचं अहान शेट्टी आणि स्वतः आलियानं स्पष्ट केलं होतं.

Web Title: Fan Calls Suniel Shetty Gutka King What Is The Exact Truthdetails

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top