बॉलीवूड पदार्पणावर शहनाझनं तोडली चुप्पी, उत्तरानं वाढवला गुंता अन् उत्सुकता | Shehnaaz Gill News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shehnaaz Gill News

बॉलीवूड पदार्पणावर शहनाझनं तोडली चुप्पी, उत्तरानं वाढवला गुंता अन् उत्सुकता

'बिग बॉस १३'(Big boss 13) मधनं सर्वांचं मन जिंकलेली आणि पंजाबची कतरिना कैफ म्हणून प्रसिद्ध असलेली शहनाझ गिल(Shehnaaz Gill) आपल्या क्युट दिसण्यासोबतच मनमोकळ्या बलण्यानं,तिच्यातील साधेपणानं सर्वांचं मन जिंकलं होतं. त्या सिझनचा बिग बॉस विनर अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची जवळची मैत्रिण असलेली शहनाझ गिल पूर्णपणे तुटलेली पहायला मिळाली. पण आता पुन्हा शहनाझ गिल आपल्या कामात व्यस्त होताना दिसत आहे. त्यातच आता चर्चा आहे शहनाझ गिल बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याविषयी, ती सलमान खानच्या(Salman Khan) सिनेमातून एन्ट्री घेतेय म्हटल्यावर बातमी वाऱ्यासारखी पसरली. सूत्रांच्या माहितीनुसार,शहनाझ सलमान खानच्या 'कभी ईद,कभी दिवाली' या हिंदी सिनेमातून पदार्पण करीत आहे. याविषयी जेव्हा तिला विचारलं गेलं तेव्हा तिच्या उत्तरानं या पदार्पणाच्या बातमीला आणखीच हवा मिळाली. चला,जाणून घेऊया सविस्तर त्याविषयी. (Shehnaaz Gill break silence on bollywood debut, what she say)

हेही वाचा: उर्मिला-आदिनाथ कोठारेत बिनसलं? दोन महत्त्वाच्या कारणांमुळे रंगली चर्चा

सलमानच्या 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमात शहनाझ त्याचा जीजू आयुष शर्मासोबत रोमान्स करताना दिसेल अशी बातमी आहे. आता यावर शहनाझ गिलनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचं झालं असं की मुंबई एअरपोर्टवर पापाराझीनं शहनाझ गिलला तिच्या बॉलीवूड पदार्पणाविषयीचा प्रश्न विचारताच सुरुवातील ती काहीही न बोलता गप्प बसली आणि मग हसली देखील. पण आता या तिच्या काहीही न बोलता दिलेल्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी मात्र तिच्या बॉलीवूड पदार्पणाच्या बातमीला आणखीन जोर धरला आहे. शहनाझनं स्पष्ट उत्तर जरी दिलं नसलं तरी हसण्यातून बातमी खरी आहे याचे संकेत मात्र दिले आहेत. (Shehnaaz Gill Latest Movie)

शहनाझ गिलच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर याआधी ती पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सोबत पंजाबी सिनेमा 'हौसला रख' मध्ये दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतूकही झालं. हा शहनाझचा सिनेमा सिद्धर्थ शुक्लाच्या निधनानंतर प्रदर्शित झाला होता. यावेळी तिच्यासाठी सिनेमाचं प्रमोशन करणं देखील खूप कठीण झालं होतं. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान शहनाझला भावूक झालेलं अनेकांनी पाहिलं असेल.

Web Title: 

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top