esakal | चाहत्यानं गर्दीचा फायदा घेऊन आर्शीला केलं किस

बोलून बातमी शोधा

Fan kisses bigg boss fame arshi khan without consent at Mumbai airport

चाहत्यानं गर्दीचा फायदा घेऊन आर्शीला केलं किस

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या बिग बॉसमधील स्पर्धक शो संपल्यानंतर देखील चर्चेत असतात. अशी बिग बॉसची हटके व्याक्तिमत्व असणारी स्पर्धक म्हणजे आर्शी खान. आर्शीच्या उर्दु भाषेवरील प्रभुत्वाचा सुपर स्टार सलमान खान फॅन झाला होता. उर्दु लेहेजा आणि प्रेमळ स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात आर्शीनं वेगळे स्थान निर्माण केले होते. बिग बॉस सिझन- 14 आणि सिझन 13 मधून आर्शीनं प्रेक्षकांचे मन जिंकले होते. नुकताच आर्शी आणि तिच्या चाहत्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकतच आर्शीला मुंबई विमानतळावर चाहत्यांनी घेरले. काही लोक तिच्या सोबत फोटो काढत होते तर काही जण तीचा ऑटोग्राफ घेत होते. पण एका चाहत्यने मात्र आर्शीला घाबरवले. फोटोग्राफर्स आर्शीचा फोटो काढत होते तेव्हा एक चाहता तिच्या जवळ आला. त्याने आर्शीला सेल्फिसाठी पोज देण्यास सांगितले. आर्शीने त्याच्यासोबत सेल्फि काढल्या नंतर त्याने तिचं लक्ष नसताना चक्क तिच्या हाताचे चुंबन घेतले. चाहत्याच्या या वागण्यामुळे आर्शी घाबरली. तेथील फोटोग्राफर्सने आर्शीला विचारले की काय झाले. तेव्हा तिने सर्वांना जाण्यास सांगितले. या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी अशा चाहत्यांपासून आर्शीला दुर राहण्याचा सल्ला दिला आहे. एका चाहत्याने कमेंट केली, ‘ही मजा घेण्याची गोष्ट नाही. तिची परवानगी नसताना देखील तिच्या हाताचे चुंबन घेणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे.’

मुंबई एअर पोर्टवर फोटो काढताना आर्शीने आणि त्या चाहत्याने मास्क देखील घातला नव्हता आणि चाहत्याने परवानगी नसतानाही चुंबन घेतले व आर्शी त्याला काहींच बोलली नाही या गोष्टी वरून सध्या आर्शीला नेटकरी ट्रोल करत आहेत.