Genelia Deshmukh वहिनी गंडलंय सगळं..! सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये जिनिलियावर चाहते नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

riteish deshmukh, genelia deshmukh, sid kiara wedding

Genelia Deshmukh वहिनी गंडलंय सगळं..! सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये जिनिलियावर चाहते नाराज

Genelia Deshmukh - Riteish Deshmukh News: जिनिलिया आणि रितेश देशमुख यांचे प्रचंड चाहते आहेत. ३० डिसेंबरला रिलीज झालेल्या वेड सिनेमामुळे या दोघांच्या फॅन्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जिनीलिया देशमुखला महाराष्ट्राची लाडकी वहिनी म्हणतात.

जीनिलिया देशमुखला मात्र पहिल्यांदाच चाहत्यांनी ट्रोल केलंय. निमित्त घडलं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या वेडिंग रिसेप्शनचं.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन झालं. या रिसेप्शनला जिनीलीया देशमुख आणि रितेश देशमुख हे नवरा बायको गेले होते.

सिद्धार्थ - कियारा रितेश - जिनिलियाचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे दोघांनी रिसेप्शनला हजेरी लावली होती. पण जीनिलियाने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलंय.

जिनिलियाने एक वेगळीच हेअरस्टाईल केलेली आणि निळ्या रंगाचा टाईट गाऊन घातला होता. तर रितेश देशमुखने सुद्धा बायकोला मॅचिंग असा कोट घातला होता.

जिनिलियाच्या ड्रेसवरून तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलंय. केस विंचरायला विसरलीस का?, "ती छान आहे पण काहीतरी वेगळीच वाटतेय. केसांचा कोंबडा झालाय आणि ड्रेस सुद्धा बकवास आहे.

याशिवाय "कायम तुम्ही ज्यात फिट होता तोच ड्रेस निवडा.. फॅशनच्या नावाखाली काहीही करू नका..", "दिसायला चांगली पण हेअरस्टाईल फसली" अशा शब्दात नेटकऱ्यांनी जिनिलिया बद्दल नाराजी व्यक्त केलीय.

एकूणच जिनिलिया देशमुखला फॅन्सनी तिच्या अजब फॅशन सेन्समुळे चांगलंच फैलावर घेतलंय. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे काहीच दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकले.

राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिड-कियारा जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. या दोघांनी मुंबई आणि दिल्लीत रिसेप्शन ठेवलं होतं.

याशिवाय रितेश आणि जीनिलिया देशमुख यांच्या वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आजवर ७४ कोटींचा गल्ला जमवला आहे.

वेड सिनेमात रितेश - जिनिलिया जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सुपरस्टार सलमान खानचं वेड लावलंय हे विशेष गाणं प्रचंड गाजलं. मराठी कलाकारांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या गाण्यावर रील व्हिडिओ बनवले आहेत.