esakal | ट्रोलर्सनाच तैमुर, सुहानाचे फोटो पहायचे असतात- फराह खान
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रोलर्सनाच तैमुर, सुहानाचे फोटो पहायचे असतात-  फराह खान

ट्रोलर्सनाच तैमुर, सुहानाचे फोटो पहायचे असतात- फराह खान

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने Farah Khan अरबाज खानच्या 'पिंच' या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये फराह खान ट्रोलिंगविषयी व्यक्त झाली. "घराणेशाहीवरून टीका करणाऱ्यांनाच तैमुर Taimur Ali Khan आणि सुहाना खानचे Suhana Khan फोटो पहायचे असतात. जे लोक ट्रोल करतात, त्यांनाच स्टारकिड्सचे फोटो सोशल मीडियावर पहायचे असतात", असं ती म्हणाली.

काय म्हणाली फराह खान?

"चला मी हे समजू शकते की माझ्या मुलांना इतकं सोशल मीडियावर फॉलो केलं जात नाही. पण जे लोकं तैमुरवर टीका करतात, तेच त्याचे फोटो जास्त पाहतात. अशा लोकांना घराणेशाहीवरून टीकासुद्धा करायची असते आणि दुसरीकडे त्यांनाच शाहरुखची मुलगी आणि करीनाच्या मुलाचे फोटो पहायचे असतात. तुम्हाला सर्वसामान्य लोकांचे फोटो पहायचेच नसतात. हा ट्रोलर्सचा दुटप्पीपणा आहे. अशा लोकांना मी फारसं महत्त्व देत नाही", अशा शब्दांत फराह खान व्यक्त झाली.

हेही वाचा: अशोकमामा सध्या काय करतायत?

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास दोन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे करीनाचा मुलगा तैमुर अली खान आणि आता जेह यांचेही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

loading image
go to top