'अरे बाबा महिला नाही पुरुष हॉकी संघ जिंकलाय', फरहान अख्तर ट्रोल

ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघानं गौरवास्पद कामगिरी केलीयं. त्याबद्दल त्यांच्यावर संबंध देशातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसून आलंय.
farhan akhtar ask troller
farhan akhtar ask troller Team esakal

ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघानं गौरवास्पद कामगिरी केलीयं. त्याबद्दल त्यांच्यावर संबंध देशातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसून आलंय. गेल्या काही दिवसांपासून ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देताना सेलिब्रेटींची चूक होताना पाहायला मिळाले आहे. यात मोठ्या सेलिब्रेटींचा समावेश आहे. पुरुष हॉकी संघानं भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलं आहे. त्यांच्यावर अनेकांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. मात्र फरहाननं ज्यावेळी त्यांच्या विजयाविषयी व्टिट केलं त्यात त्याची चूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो ट्रोल झाला आहे. आश्चर्य म्हणजे त्यानं ते व्टिट ट्रोल झाल्यामुळे डिलीटही केलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष संघानं गौरवास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. दुसरीकडे त्यांचे अभिनंदन करताना अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर ट्रोल झाला आहे. त्यानं कांस्य पदक जिंकणाऱ्या पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा न देता त्या महिला हॉकी संघाला दिल्या आहेत. त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोलही केले आहे. 41 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला आहे. त्यांनी बलाढ्य अशा जर्मनीला 5-4 असे हरवले आहे. त्यामुळे देशवासीयांनी त्यांचे कौतूक केले आहे. त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

फरहाननं आपल्या व्टिटमध्ये लिहिले होते की, मुलींनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला टीम इंडियावर गर्व आहे. आपण चौथं पदक जिंकून देशाचं नाव मोठं केलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा फरहानला आपली चूक लक्षात आली तेव्हा त्यानं ते व्टिट डिलिट केल्याचे दिसुन आले. मात्र तोपर्यत बराच उशिर झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com