या अभिनेत्याला सेटवर झाली दुखापत; सहन करतोय हेअरलाईन फ्रॅक्चर

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

'तूफान'च्या शूटींगदरमन्यान तो जखमी झाला आहे. ही दुखापत इतकी मोठी निघाली की त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय.

प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरला सध्या एका त्रासाला सोमोरं जावं लागलं आहे. त्याचा आगामी चित्रपट 'तूफान'च्या शूटींगदरमन्यान तो जखमी झाला आहे. ही दुखापत इतकी मोठी निघाली की त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय. फरहानने त्याच्या एक्स-रेचा फोटो इन्स्टाग्राम शेअर केलाय.

'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकचं कास्टिंग झालं! कोण साकारणार अमिताभ-हेमामालिनी?

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित तूफान या चित्रपटाचे रविवारी (ता. 13) सुरू होते. तेव्हा बॉक्सिंगच्या सीनदरम्यान त्याला हाताला लागले व त्याच्या तळहाताचे स्नायू दुखावले गेले. डॉक्टरांना दाखवले असता हेअरलाईन फ्रॅक्चरचे निदान झाले. फरहानने त्याच्या हाताचा एक्सरे इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, 'माझी पहिली बॉक्सिंग इंज्युरी...' 

या बॉलिवूड अभिनेत्रीने स्वीकारले प्रियकराचे प्रपोजल

तूफानमध्ये फरहान एका बॉक्सर प्लेयरची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तो बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. तर त्याच्या कोचच्या भूमिकेत परेश रावल आपल्याला तूफानमध्ये दिसतील. फरहान नेहमीच आपल्या प्रशिक्षणाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.  

राकेश ओमप्रकाश मेहरांसोबत त्याने यापूर्वी 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट केला होता. त्यामुळे तूफान कसा असले याकडे फरहानच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.   

काँग्रेस नेत्याच्या मुलीचे हॉट फोटो चर्चेत, तुम्ही पाहिले का?

फरहानचा नुकताच स्काय इज पिंक हा चित्रपट प्रदर्शित झालाय. ज्यात प्रियांका चोप्रा त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसते. हा ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farhan Akhtar suffered from hairline fracture on Toofan set