Farmani Naaz : 'हर हर शंभू' नंतर कृष्ण भक्तीत फरमानी नाज तल्लन, व्हिडिओ होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmani Naaz Sing Har Har Krishna

'हर हर शंभू' नंतर कृष्ण भक्तीत फरमानी नाज तल्लन, व्हिडिओ होतोय व्हायरल

Farmani Naaz Song : 'हर हर शंभू' गाण्याच्या गायनाने चर्चेत आलेल्या फरमानी नाजचे (Farmani Naaz) नवीन भजन गीत प्रदर्शित झाले आहे. शिव भजननंतर आता फरमानी कृष्ण भक्तीत तल्लन दिसत आहे. तिचे नवीन भजन हर हर कृष्णा (Har Har Krishna) प्रदर्शित झाले आहे. एकाच दिवसात या गाण्याला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. (Farmani Naaz New Song Hare Hare Krishna After Har Har Shambhu)

हेही वाचा: KKK12 : कॅप्टन्सी टास्कमध्ये २ स्पर्धक जिंकले, एलिमिनेशनपासूनही संरक्षण

श्रावण महिन्यात सगळीकडे फरमानी नाजचे शिव भजन 'हर हर शंभू' गाजत आहे. मात्र काही मुस्लिम कट्टरपंथींना फरमानी नाजला हे भजन आवडलेले नाही. त्यानंतर त्यांना धमक्या मिळण्यास सुरुवात झाली. असे असतानाही फरमानी घाबरली नाही. पाहा आता तर ती कृष्ण भक्तीत तल्लन झालेली दिसत आहे. (Entertainment News)

हेही वाचा: बाॅलीवूडमधील जिवलग मित्र, पडद्याबरोबरच खऱ्या आयुष्यातही देतात साथ

यावेळी फरमानी नाजने 'हर हर कृष्णा' भजन गायले आहे. भजन प्रदर्शित होऊन आता फक्त एकच झाला आहे आणि व्हिडिओला १५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांचे प्रेम पाहून फरमानी येथेच थांबली नाही. ती पुढेही असे वेगवेगळे भजन गाणार असल्याचे दिसेल. फरमानी नाज म्हणते, धमक्यांना मी घाबरत नाही. ती पूर्वीपासून गाणे गात आली आहे. ती तसेच गात राहणार नाही.

Web Title: Farmani Naaz New Song Hare Hare Krishna After Har Har Shambhu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..