'साला इतना पैसा कमाना है की मुझे...' फर्जीचा फाडू ट्रेलर एकदा पाहाच! |Farzi Trailer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farzi Trailer

Farzi Trailer : 'साला इतना पैसा कमाना है की मुझे...' फर्जीचा फाडू ट्रेलर एकदा पाहाच!

Farzi web serise Trailer Out Shahid Kapoor Vijay Setipathi : बॉलीवूडमधील स्टार अभिनेता शाहिद कपूर आणि टॉलीवूडचा सुपरस्टार विजय सेतूपती हे आता फर्जीमधून एकत्र दिसणार आहे. त्याचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आणि त्यावर नेटकऱ्यांचा कौतूकाचा वर्षाव होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती.

फर्जीमधील डायलॉग हे लक्ष वेधून घेत आहे. मारधाड, शिवीगाळ मात्र तितकेच थेट आणि आक्रमक पद्धतीच्या या ट्रेलरनं अवघ्या तासाभरात दहा लाखांहून अधिक व्ह्युज मिळवले आहेत. त्यावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येईल. शाहीद आणि विजयचा दिलखेचक अभिनय ही फर्जीची मोठी ताकद आहे. द फॅमिली मॅनचे दिग्दर्शक राज डीके राज यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Also Read - पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

विजय सेतूपती आणि शाहीद कपूर हे पहिल्यांदाच एकत्रितपणे काम करताना दिसणार आहे. साऊथमध्ये विजयचा मोठा चाहतवर्ग आहे. दहा फेब्रुवारीला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहीद देखील पहिल्यांदाच वेबसीरिजच्या माध्यमातून चाहत्यांना भेटणार आहे. त्यामुळे त्याची मोठी उत्सुकता आहे.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

फॅमिली मॅनची निर्मिती करणाऱ्या राज डीके यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून त्यांच्या यापूर्वीच्या वेबसीरिजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. फर्जी ही मालिका अॅमेझॉन प्राईमवर दहा फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. या मालिकेत केके मेनन, राशि खन्ना, भुवन अरोडा, जाकीर हुसैन, चित्तरंजन गिरी, जसवंत सिंह दलाल, अमोल पालेकर, यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा: Kuttey Review : 'कुत्ते' पाहिल्यावर तोंडातून शिव्याच बाहेर पडणार! नुसताच...

ट्रेलरविषयी बोलायचे झाल्यास त्यामध्ये शाहिर कपूर हा मवाल्याच्या भूमिकेत दिसतो आहे. त्याच्या स्वप्नांची उंची मोठी आहे. त्याला खूप पैसा कमवायचा आहे. ती त्याची इच्छा आहे. त्याला स्वताला गरीब म्हणवून घेणे पसंत नाही. अशावेळी तो जे काही करतो त्यावरुन मोठ्या संघर्षाला सुरुवात होते. तो काय आहे, कसा असणार आहे हे ट्रेलरमध्ये दिसून येते.

मैं इतना पैसा कमाना चाहता हू की उसकी इज्जत ना करनी पडी असे जेव्हा शाहिद म्हणतो तेव्हा त्याच्या या संवादाला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळणार हे नक्की. याशिवाय सबके अंदर चोर है सिर्फ चान्स का वेट करता है... या डायलॉगनं लक्ष वेधून घेतले आहे.