
मी फॉलो करेन अशी विशिष्ट प्रकारची कोणतीच फॅशन नाही, पण मी पोशाख परिधान करताना ते आरामदायी असण्याची आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतील याची खात्री करून घेते. मला पारंपारिक पोशाख परिधान करायला, विशेषत: साडी नेसायला आवडते. पण मी वारंवार साडी नेसत नाही.
म्हणून मी ज्यावेळी साडी नेसते, त्यावेळी मी साडीसोबत हाय हिल्स घालणे टाळते. कारण स्टिलेटोस किंवा हाय हिल्ससोबत साडीवर वावरणे अवघड आहे आणि अडखळून पडण्याची नेहमीच भिती असते. मी पारंपारिक पोशाख परिधान करते तेव्हा त्यांना साजेशी अशी आभूषणे देखील परिधान करते. कारण, आभूषणे व पोशाख एकमेकांना शोभून दिसले पाहिजेत. 'सोनी सब' या वाहिनीवर 'मॅडम सर' या मालिकेत मी एका महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
त्यामुळे प्रेक्षकांनी मला नेहमीच पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशातच पाहिलं आहे. पण, माझ्या सोशल मीडियावर माझ्या फोटोजमध्ये माझ्या चाहत्यांना माझे अनेक वेस्टर्न आणि ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये फोटोज पाहायला मिळतात. माझा फॅशन फंडा अत्यंत सोपा आहे. पारंपारिक असो किंवा पाश्चिमात्य तुम्ही निवडणाऱ्या पोशाखामध्ये तुम्हाला आत्मविश्वास वाटला पाहिजे, जे फॅशनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
कपडे खरेदी करताना विविध रंगांची निवड करताना मी काहीशी गोंधळून जाते. पण, मला अत्यंत कॉमन नसलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या कॉम्बिनेशनसोबत प्रयोग करायला आवडतो. मला गडद रंग आवडतात, ज्यामधून ग्लॅमर दिसून येईल. मी पायजमा जरी घातला तरी तुम्हाला तो बहुतेकदा गडद व आकर्षक रंगांचा असलेला पाहायला मिळेल. खरतर माझी कोणीच फॅशन आयकॉन नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर माझी कोणाच्याही फॅशन स्टाइलचे अनुकरण करण्याची इच्छा नाही. म्हणून माझी कोणीच फॅशन आयकॉन नाही.
फॅशन टिप्स....
1) आपल्या त्वचेला आरामदायी वाटेल अशा फॅशनचा अवलंब करावा.
2) कोणालाही फॉलो न करता तुमची स्वतःची स्टाईल बनवा.
3) पोशाखाच्या फिटिंगकडे लक्ष द्या.
4) तुम्ही कोणताही पोशाख परिधान करा, त्यामध्ये तुम्हाला आरामदायी वाटले पाहिजे.
5) तुम्हाला आरामदायी वाटत असेल तर ते आऊटफिट/लुक तुम्हाला शोभून दिसेल. हेच खऱ्या फॅशनचे सौंदर्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.