फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेलाचा मृत्यू, बाथरूममध्ये आढळला मृतदेह.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fashion designer Prathyusha Garimella found dead in hyderabad home

फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेलाचा मृत्यू, बाथरूममध्ये आढळला मृतदेह..

Prathyusha Garimella : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (tollywood) प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला शनिवारी (11 जून) रोजी तिच्या हैदराबाद (तेलंगणा) बंजारा हिल्स येथील घरात मृतावस्थेत आढळून आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Fashion designer Prathyusha Garimella found dead in hyderabad home)

मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय फॅशन डिझायनर प्रत्युषा गारिमेला ही बंजारा हिल्समध्ये राहत होती. तिच्याशी संपर्क होत नसल्याने शनिवारी दुपारी तिच्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा, घरच्या बाथरूममध्ये प्रत्युषाचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा: गुटखा खायचा सराव करत होती प्राजक्ता माळी.. पाहा नेमकं काय म्हणाली..

या तपासात पोलिसांना तिच्या खोलीत कार्बन मोनॉक्साईडची बाटली सापडली. त्यामुळे प्रत्युषाने कार्बन मोनॉक्साईडचा वापर करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे.

प्रत्युषा गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होती. तिच्यावर उपचारही सुरू असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांना तपासात एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. यात लिहिले होते की, प्रत्युषा आयुष्यात खूप एकटी होती, त्यामुळे तिने आत्महत्या केली. त्यासाठी ती कोणाला दोषी मानत नाही. मात्र, हे प्रकरण खरंच आत्महत्येचे आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Fashion Designer Prathyusha Garimella Found Dead In Hyderabad Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top