प्रसिद्ध फॅशन डिझायनर सिमर दुग्गलचे कर्करोगाने निधन

संतोष भिंगार्डे
Wednesday, 12 August 2020

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर, मलायका अरोरा खान, सोफी चौधरी अशा कित्येकांसाठी फॅशन डिझायनर म्हणून सिमर दुग्गलने काम पाहिले आहे.

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि मॉडेल सिमर दुग्गलचे कर्करोगामुळे आज निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही सेलेब्सनी तसेच फॅशन जगतातील काही मंडळींनी तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. फॅशन जगताला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला हा एक मोठा हादरा आहे.

नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप; आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर, मलायका अरोरा खान, सोफी चौधरी अशा कित्येकांसाठी फॅशन डिझायनर म्हणून सिमर दुग्गलने काम पाहिले आहे. गेले काही दिवस ती कर्करोगाने पीडित होती. आज तिने अखेरचा श्वास घेतला आहे. तिच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री मलायका अरोरा, रिद्धीमा कपूर, श्वेता बच्चन यांनी तिला श्रद्धांजलीही वाहिली. 

मुंबई पालिकेच्या 'या' रुग्णालयात लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड OPD

मलायका अरोरा म्हणते, की  'माझे डोळे भरुन आले आहेत. ती माझी फार चांगली मैत्रीण, माझी जोडीदार होती. तुझी फार फार आठवण येईल. तुझ्या आत्म्यास शांती लाभो'. अनेक बॉलिवूडकरांनी सिमर यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. 
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fashion designer simar duggal passed away amid cancer infection