आणखी दोन चित्रपटांनंतर ''फास्ट अँड फ्युरियसचा दि एंड''

Fast and Furious to end after two more films
Fast and Furious to end after two more films

मुंबई - एक दोन नव्हे तर तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या फास्ट अँड फ्युरियस या चित्रपटाची प्रवास आता थांबणार आहे. आणखी दोन भागानंतर त्याची निर्मिती थांबणार आहे. यंदाच्या वर्षी त्याचा एक भाग प्रसिध्द होणार होता. मात्र कोरोनामुळे त्याच्या प्रदर्शनाला ब्रेक लागला. यामुळे त्याची निर्मिती पुढे ढकलण्यात आली आहे.

व्हिन डिझेल, मिचेल रॉडरीगेझ, लुडाक्रिस, टायरिस गिब्सन यांची प्रमुख भूमिका असलेला फास्ट अँड फ्युरियस जगभरात कमालीची लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाचा एक भाग यावर्षी याय़चा होता. मात्र कोरोनामुळे तो पुढे ढकलण्यात आल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. या नव्या भागाचे दिग्दर्शन जस्टीन लिन हे करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत तिस-या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि नवव्या भागाचे दिग्दर्शन केले आहे. शेवट्च्या भागांचे दिग्दर्शन करण्यासाठीही त्य़ांना गळ घालण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

 चालु वर्षी फास्ट अँड फ्युरियस F9 हा भाग प्रदर्शित होणार होता. आता या सिनेमाचे एकूण 11 भाग होणार आहेत. ज्या भागावर कथानक संपले होते तेथुनच पुढील भाग प्रदर्शित होणार आहेत. फास्ट अँड फ्युरियस चा पहिला भाग हा 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. डिझेल आणि पॉल वॉकर यांनी यात काम केले होते. मात्र त्यावेळी या चित्रपटाला ज्युरासिक पार्कबरोबर स्पर्धा करावी लागली. आतापर्यतच्या 8 भागांनी मिळून 5.7 बिलियन एवढी कमाई केली. तर एकट्या ज्युरासिक पार्कने 5 बिलियन कमाई केली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@vindiesel wünscht der deutschen #FastFamily einen starken Wochenstart! #fastandfurious #wochenstart #vindiesel #dom

A post shared by Fast & Furious 9 (@fastandfuriousde) on

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com