Father's Day 2023: पप्पा तुस्सी ग्रेट हो! अरबाज, संजय दत्त ते शिल्पा शेट्टी सेलेब्सची पोस्ट चर्चेत..

Father's Day 2023
Father's Day 2023Esakal

आज सर्वत्र फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने प्रत्येक जण आपल्या परिने वडिलांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यातच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या लाडक्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत त्यांनी वडिलांसाठी हा दिवस खास बनवला आहे.

शिल्पा शेट्टी, गौहर खान, अरबाज खान अशा अनेक कलाकरांनी वडिलांसोबत पोस्ट शेयर केली आहे.

वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेता-निर्माता अरबाज खानने सलीम खानचे अनेक अनसीन फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये तिचा सलमान खान, तिची आई सलमा खान आणि सलीम खानचे माजी सह-लेखक जावेद अख्तर, हेलन, अलविरा खान, अर्पिता खान आणि सोहेल खान देखील आहेत.

Father's Day 2023
Heart Of Stone Trailer: 'हिरो नही व्हिलन'! आलियाची हॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री..'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर रिलिज...

यातच गौहरनेही तिच्या पतीसाठी खास पोस्ट शेयर केली आहे. नुकतिच आई झालेल्या गौहरने पितृत्व स्वीकारलेल्या पती झैद दरबारसाठी एक खास नोट लिहिली आहे. यात तिने लिहिलयं की, , "हॅपी फादर्स डे झैद !!!! आपल्या लग्नाच्या पहिल्या दिवशी तू माझ्याकडे पाहिलं आणि आता तू जेहानकडे पाहतांना.. ते फक्त खरं प्रेम आहे.

Father's Day 2023
Adipurush dialogue: गडी नमला! डायलॉग वादावर लेखकाचा महत्वाचा निर्णय, आता सिनेमात...

करण जोहरनेही पोस्ट शेयर केली आहे. ज्यात तो म्हणतो की, "माझा सर्वात मोठे आशीर्वाद, माझी सर्वात मोठी ताकद, माझे सर्वात मोठे टीकाकार आणि मी जे काही करतो त्यामागे माझी सर्वात महत्वाच कारणं. मला रुही आणि यशचे वडील बनवल्याबद्दल धन्यवाद! दादा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझे मार्गदर्शक बनल्याबद्दल धन्यवाद बाबा.

Father's Day 2023
Prabhas Adipurush: आदिपुरुषचा वाद पेटला, प्रभास सगळं सोडून अमेरिकेत निघाला!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासाठी एक पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टसोबतच तिने एक व्हिडिओ शेयर केला आहे. तिने ही पोस्ट विआन आणि समीशाच्या वतीने लिहिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने देखील सोशल मीडियावर तिच्या मुलीचे वडील करण सिंग ग्रोव्हर यांच्यासाठी एक खास नोट लिहिली आहे. या मेसेजसोबत बिपाशाने एक क्यूट व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये करण त्याची मुलगी देवीसोबत प्रेमळ क्षण घालवताना दिसत आहे

संजय दत्त याने देखील त्याच्या वडिलांचा फोटो शेयर करत फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर साउथ स्टार अल्लू अर्जूने देखील त्याच्या वडिलांसोबतचा फोटो शेयर करत फादर्स जे साजरा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.