Fatima Sana Sheikh: 'दंगल' गर्लला या कारणामुळे सोडायचा होता अभिनय, मग आयुष्याने असा घेतला यू-टर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fatima Sana Sheikh

Fatima Sana Sheikh: 'दंगल' गर्लला या कारणामुळे सोडायचा होता अभिनय, मग आयुष्याने असा घेतला यू-टर्न

फातिमा सना शेखने 2016 साली 'दंगल' चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला होता. या चित्रपटात ती गीता फोगटच्या भूमिकेत दिसली होती. फातिमा सना शेख 11 जानेवारीला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आज फातिमा 31 वर्षांची झाली आहे, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 'दंगल गर्ल'च्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. फातिमा सना शेख काश्मीरमधील मुस्लिम कुटुंबातील आहे. तिच्या वडिलांचे नाव विपिन शर्मा आणि आईचे नाव राज तबस्सुम आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की 'दंगल' हा फातिमा सना शेखचा पहिला चित्रपट आहे तर तुम्ही चुकीचे आहात. तुम्हाला सांगतो, फातिमा पहिल्यांदा 1997 मध्ये आलेल्या 'चाची 420' चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर ती 'वन टू का फोर' या चित्रपटातही दिसली.

मात्र, या चित्रपटानंतर ती 15 वर्षे चित्रपटांपासून दूर राहिली. फातिमा सना शेखने छोट्या पडद्यावरही काम केले आहे. तिने 'बेस्ट ऑफ लक निक्की', 'लेडीज स्पेशल' आणि 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने तिला अभिनय सोडायचा होता.

हेही वाचा: Krrish 4: 'क्रिश ४'ची भरारी लांबणीवर!.. हृतिकनेच संगितलं सिनेमा रखडण्याचं कारण..

फातिमा सना शेख ला फोटोग्राफीमध्ये रस आहे, ज्याचा तिने अनेकदा उल्लेख केला आहे. फातिमानेही या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती, त्यानंतरच तिला 'दंगल' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी ती ऑडिशनला गेली आणि 6 फेऱ्या पार केल्यानंतर तिला गीता फोगटची भूमिका मिळाली. फातिमा सना शेखचा लग्नावर विश्वास नाही. जर तुम्हाला कुणासोबत राहायचे असेल तर ते नाते कागदपत्रात लिहून सिद्ध करण्याची गरज नाही, असे या अभिनेत्रीचे मत आहे.