'लय भारी' फेम दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती गंभीर

संतोष भिंगार्डे
Tuesday, 11 August 2020

निशिकांत कामत हा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक आहे. 'डोंबिवली फास्ट', 'लय भारी' हे मराठी चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. 

मुंबई : मराठीतील सुपरहिट 'लय भारी' चित्रपटाचा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती खालावल्याची बातमी समोर येते आहे. हैदराबाद येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरूआहेत. निशिकांत कामत यांना लिव्हर सिरोसीसचा त्रास झाला होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी ते हैदराबादला गेले होते. तेथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांची तब्येत गंभीर आहे. 

अभिनेत्री हेमांगी कवीने पुरुषांच्या अस्वच्छतेवर व्यक्त केला संताप, 'वेस्टर्न टॉयलेट कसं वापरावं हे कळत नसेल तर...'

निशिकांत यांच्या प्रकृतीबाबत याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. निशिकांत कामत हा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक आहे. 'डोंबिवली फास्ट', 'लय भारी' हे मराठी चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. 

हिंदमातासाठी आता नवा प्रयोग; पाणी वाहून जाण्यासाठी बोगद्याचा विचार, वाचा सविस्तर

'सातच्या आत घरात' या मराठी चित्रपटात त्याने काम केले आहे. हिंदीमध्ये दृश्यम, मदारी असे काही चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. तसेच ज्युली 2 आणि रॉकी हॅण्डसम या चित्रपटामध्ये काम केले आहे. आता त्याचे दरबार या चित्रपटावर काम सुरू होते. 
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film Lai Bhari director Nishikant Kamats health creatical