अभियंत्याच्या जीवनावर चित्रपट 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण हा बाबा रामदेव यांच्यावर दूरचित्रवाहिनी मालिका तयार करणार आहे. त्यासाठी त्याने निर्माता अभिनव शुक्‍ला यांना सोबत घेतले असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे तो अभिनव शुक्‍ला यांच्यासोबत जसवंत सिंग गिल या मुख्य अभियंत्यावर चित्रपट तयार करणार आहे. गिल यांनी पश्‍चिम बंगालमध्ये प्राणांची पर्वा न करता कोळसा खाणीतील 64 कामगारांचा जीव वाचवला होता. चित्रपटासाठी अजयला "रुस्तम'चे दिग्दर्शक टीनू सुरेश देसाई मदत करणार आहेत. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू आहे. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही. पुढील वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. 

Web Title: Film on the life of the engineer