हृतिक अन् सैफचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात, रिलायन्स'कडून स्पष्टीकरण

हृतिक अन् सैफचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात !
bollywood actor hrithik roshan saif ali khan in hindi remake southern vikram vedha
bollywood actor hrithik roshan saif ali khan in hindi remake southern vikram vedhaesakal

हृतिक रोशन-सैफी अली खान यांचा 'विक्रम वेध' हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. तत्पूर्वीच एक नवीन वाद निर्माण झाला आहे. माध्यमांमधील वृत्तांनुसार हृतिकने (Hrithik Roshan) उत्तर प्रदेशात चित्रपटाच्या चित्रीकरणास नकार दिला. त्याच्या विनंतीनुसार टीमने यूएईमध्ये भारतीय राज्याचे प्रतिबिंब दिसणारे सेट तयार केले होते. रिलायन्स एंटरटेन्मेंट हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रिलायन्सकडून सोमवारी (ता.चार) प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करुन सर्व वादाबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Vikram Vedha Producer Give Clarification On Hrithik Roshan Refuse To Shoot In UP)

bollywood actor hrithik roshan saif ali khan in hindi remake southern vikram vedha
मधुबालासोबतच्या लग्नासाठी किशोरने धर्म बदलला होता का ? बहिणीचं स्पष्टीकरण

दुसरीकडे निर्माता कंपनीने आबू धाबीत चित्रीकरणाविषयी पुष्टी दिली, त्यांनी वृत्त हे दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले. प्रसिद्धीपत्रक रिलायन्स एंटरटेंमेंटने ट्विटरवर शेअर केले आहे. त्यात म्हटले आहे, की विक्रम वेधच्या चित्रीकरण स्थळाविषयी बऱ्याच दिशाभूल आणि पूर्णपणे अप्रमाणित बातम्या दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहेत. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की विक्रम वेधचे (Vikram Vedha) बहुतेक चित्रकरणाचा मोठा भाग लखनौत पूर्ण झाला आहे. चित्रपटाचा काही भाग संयुक्त अरब इमिरट्समध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ पासून चित्रीकरण करण्यात आले. हे फक्त एकच स्थळ होते जिथे मुलभूत सुविधा जसे की बायो बबल यासारख्या सोयी सुविधा होत्या.

bollywood actor hrithik roshan saif ali khan in hindi remake southern vikram vedha
हृतिक रोशन दाढीचा करणार त्याग; 'शेवटचा फोटो' म्हणत केली पोस्ट

आम्ही आरोग्य आणि प्रोटोकाॅलसाठी याची निवड केली. या वस्तुस्थितीकडे स्पष्टपणे चुकीने पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आम्हाला रिलायन्स एंटरटेंमेंटला आनंदच होईल, सर्जनशील लोकांकडून आलेल्या सल्ल्याचे आम्ही स्वागतच करु ! निर्मिती आणि पैशाबाबतचा निर्णय केंद्रीय पद्धतीने घेतले जातात, असे रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com