'संजूबाबा'च्या जीवनावर आधारित चित्रपटाचे 'शूट' सुरू

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई- अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार असल्याचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी यापूर्वीच जाहीर करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरवात झाली आहे.

हिरानी यांनी शनिवारी संजूबाबाच्या चाहत्यांना ट्विटरवरून ही 'गुड न्यूज' दिली. त्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा हिने रविवारी ट्विटरवरून चित्रीकरणाला सुरवात झाली असल्याचे सांगितले.
दियाने या चित्रीकरणाच्या सेटवरील एक फोटोही शेअर केलाय. त्यामध्ये दियासोबत रणबीर कपूर, लेखत अभिजात जोशी, राजकुमार हिरानी, विकी कौशल हे केक कापताना दिसत आहेत. 

"जगातील सर्वात आनंदी ठिकाण म्हणजे राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटाचा सेट" अशा शब्दांत दियाने त्या फोटोसोबत आपल्या भावनाही शेअर केल्या आहेत. बऱ्याच दिवसांनी ब्रेक मिळाल्याने दिया खूश आहे असं दिसतंय. 
 
रणबीर कपूर हा संजय दत्तची भूमिका बजावणार आहे. या चित्रपटात परेश रावल हे संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांची भूमिका करणार आहेत. अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. नर्गिस यांचे काम कोण करणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

Web Title: film shoot of biopic on sanjay dutt begins