67th Filmfare Awards : सुभाष घईंना जीवन गौरव पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Subhash Ghai

67th Filmfare Awards : सुभाष घईंना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

67th Filmfare Awards 2022 : बहुप्रतिक्षित फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Awards) सोहळा मुंबईत (Mumbai) आज पार पडत आहे. ६७ व्या पुरस्कार सोहळ्याचे प्रायोजक वोल्फ ७७७ न्यूज आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर हे दोघे करित आहेत. सोहळ्यात विकी कौशलची भूमिका असलेल्या 'सरदार उधम सिंग' चित्रपटाने बेस्ट अॅक्शन, बेस्ट बॅकग्राऊंट आणि बेस्ट व्हिएफएक्स पुरस्कार पटकावला आहे.

हेही वाचा: विकी कौशल आणि रश्मिकाची 'माचो' जाहिरात, नेटकरी करतायेत ट्रोल

- असिस कौर यांना उत्कृष्ट पार्श्वगायकाचा शेरशहा चित्रपटातील 'रतन लाम्बिया' या गाण्यासाठी पुरस्कार मिळाला

- सुभाष घई यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते फार भावूक झाले होते.

हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाकडून अमिषा पटेलला दिलासा, कोट्यावधींची फसवणुकीचा होता आरोप

- उत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) पुरस्कार बी प्राकला शेरशहामधील 'मन भारिया' या गाण्यासाठी दिले गेला.

- उत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) पुरस्कार बी प्राकला शेरशहामधील 'मन भारिया' या गाण्यासाठी दिले गेला.

- उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार कौसर मुनीर यांना चित्रपट ८३ मधील 'लेहरा दो' गाण्यासाठी प्रदान करण्यात आला. पहिल्यांदाच एका महिला गीतकाराला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे.

- उत्कृष्ट संगीत अल्बमचा पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणींची भूमिका असलेल्या शेरशहाला मिळाला.

- चित्रपट विश्वातील पदार्पणासाठी बेस्ट डेब्यू पुरस्कार सीमा पहवा यांनी 'रामप्रसाद की तेहरवी'साठी देण्यात आला आहे.

- - शर्वरी वाघला बेस्ट डेब्यू फिमेल पुरस्कार बंटी और बबली २ यासाठी देण्यात आला आहे.

Web Title: Filmfare Awards 2022 Vicky Kaushal Starrer Sardar Udham Bags Award For Best Action

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..