सर्वोच्च न्यायालयाकडून अमिषा पटेलला दिलासा, कोट्यावधींची फसवणुकीचा होता आरोप

सर्वोच्च न्यायालयाकडून अभिनेत्री अमिषा पटेलला दिलासा
Amisha Patel
Amisha Patel esakal

Supreme Court Stays Criminal Proceedings Against Amisha Patel : अभिनेत्री अमिषा पटेलला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अमिषावर फसवणूक आणि विश्वासघात केल्याचा आरोप आहे. झारखंडमधील कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी समन्स बजावले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने अमिषा पटेल (Amisha Patel) विरुद्धच्या फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे.

अभिनेत्रीने ५ मे २०२२ रोजी याचिका दाखल केली होती, ज्यावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court Of India) सुनावणी झाली. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि पी.एस. नरसिंहा यांच्या पीठाने झारखंड सरकारला नोटीस बजावली आहे.

Amisha Patel
बाॅक्स ऑफिसवर बाॅलीवूडची जादू गायब, आमिर अन् अक्षयचे चित्रपट चालेना

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले

निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ (चेक बाऊन्स) अंतर्गत कारवाई कायद्यानुसारच केली जावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटले आहे. भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम ४०६ (गुन्हेगारी भंग) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत केवळ नोटीस जारी करा, असे न्यायालयाने म्हटले. पुढील आदेशापर्यंत, आयपीसीच्या कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत फौजदारी कारवाईला स्थगिती दिली जाईल. (Bollywood News)

Amisha Patel
Ranveer Singh : न्यूड फोटोशूट वादावर रणवीर म्हणाला - अंदाज आला...

निर्मात्याने तक्रार केली होती

निर्माते अजय कुमार सिंह यांनी अमिषा पटेल विरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यावर ट्रायल कोर्टाने भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२०, ३४ आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत दखल घेतली.

अजय कुमार सिंह यांच्या तक्रारीनुसार, 'देसी मॅजिक' चित्रपटाच्या निर्मितीसाठी अमिषा पटेलच्या खात्यात २.५ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. अमिषाने आश्वासनाप्रमाणे चित्रपटाची पुढील प्रक्रिया केली नाही आणि पैसेही परत केले नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com