Aishwarya Rajinikanth: 'घर का भेदी...', रजनीकांतच्या मुलीच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे गजाआड.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aishwarya Rajinikanth

Aishwarya Rajinikanth: 'घर का भेदी...', रजनीकांतच्या मुलीच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे गजाआड..

Aishwarya Rajinikanth: दाक्षिणात्य सुपरस्टार थलाइवा रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरी मोठी चोरी झाली होती. चित्रपट निर्माती ऐश्वर्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास तेनमपेट पोलीस करत होते. मात्र, थेट रजनीकांत यांच्या मुलीच्या घरी चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यातच ऐश्वर्याने घरातील तीन कर्मचाऱ्यांवर चोरीचा संशय व्यक्त केला होता.

या प्रकरणी ऐश्वर्या यांच्या घरात काम करणारी मोलकरीण आणि त्यांच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आली आहे. दोन दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरीणचे नाव ईश्वरी आहे. तर ड्रायव्हरचे नाव वेंकटेशन आहे. गेल्या 18 वर्षापासून ईश्वरी ऐश्वर्या यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करते. तिला ऐश्वर्याच्या घरातील प्रत्येक कोपऱ्या न् कोपऱ्याची माहिती होती.

तिला चावीचे ठिकाण माहित होते आणि लॉकर उघडण्यासाठी तिने ती वापरली. तिने यापूर्वीही ऐश्वर्याच्या घरातील लॉकरमधून चोरी केल्याची धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे.

या दोघांच्या सांगण्यावरून ईश्‍वरीने सुमारे 100 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 30 ग्रॅम वजनाचे हिऱ्याचे दागिने तसेच 4 किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरले. महिलेने सर्व दागिने विकून त्यातून मिळालेले पैसे घर खरेदीसाठी वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोलकरणीकडून चोरी केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली असून घर खरेदीशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती ऐश्वर्याने दिली होती, या आधारे हा तपास करण्यात आला.