बॉलीवूडवर शोककळा, प्रसिद्ध निर्माते जॉनी बक्शी यांचं निधन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 5 September 2020

शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध सिनेनिर्माते जॉनी बक्शी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे. 

मुंबई- बॉलीवुड साठी 2020 हे वर्ष खुपच वाईट ठरत आहे. एकानंतर एक कलाकार आपल्यातुन निघुन जात आहेत. आता शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध सिनेनिर्माते जॉनी बक्शी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे. 

हे ही वाचा: रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार, एनसीबी रविवारी करणार रियाची चौकशी

राजेश खन्ना आणि गुलशन ग्रोवर स्टारर सिनेमा 'खुदाई' चे निर्माता जॉनी बक्शी होते. त्यांनी बॉलीवुडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं. जॉनी बक्शी यांनी 'मंजिले और भी है', 'मेरा दोस्त मेरा दुश्मन', 'फिर तेरी कहानी याद आई', 'विश्वासघात', 'रावण', 'इस रात की सुबह नही' सारख्या अनेक सिनेमांचे निर्माते म्हणून काम केलं. जॉनी बक्शी यांनी 2010 मधील 'कजरारे' या सिनेमासाठी निर्माते म्हणून शेवटचं काम केलं होतं. या सिनेमात हिमेश रेशमिया होता. 

बक्शी यांच सिनेमावर खुप प्रेम होतं. याच कारणामुळे हॉलीवुड स्टार मार्लोन ब्रैंडोपासुन प्रेरित होऊन त्यांच्या मुलाचं नाव ब्रैंडो ठेवलं होतं. त्यांनी कित्येक वर्ष राज खोसला यांच्यासोबत सहाय्यक म्हणून काम केलं होतं. बक्शी 'इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशन'चा एक भाग होते. ते या असोसिएशनच्या सक्रिय सदस्यांपैकी एक होते. 

filmmaker johnny bakshi passes away


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: filmmaker johnny bakshi passes away