नेहाने दिली रोहनप्रीत सोबतच्या रिलेशनशीपची कबूली; रोका सेरेमनीचे फोटो व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. कदाचित याच महिन्यात दिल्लीत त्यांचा विवाह होणार असल्याचे त्यात म्हटले होते. लग्न करण्याबाबत अद्याप त्या दोघांकडून अधिकृत कुठलेही माहिती पुढे आलेली नाही. 

मुंबई - प्रसिध्द गायिका नेहा कक्कर हिने तिच्या आणि रोका सेरेमनीच्या रिलेशनशिपची माहिती नुकतीच सोशल मीडियावर प्रसिध्द केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या रोका सेरेमनीचे फोटोही व्हायरल झाले असून त्यावर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा तिच्या नव्या नात्यांच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. 'राइजिंग स्टार' फेम रोहनप्रीत (Rohanpreet) याच्यासोबतच्या तिच्या रिलेशनशिपला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.

सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात तिने 'राइजिंग स्टार' फेम रोहनप्रीत बरोबरच्या नात्याची जाहीर कबूली देत ' तु माझा आहेस' अशा ओळी त्या फोटोखाली लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. नेहाच्या फोटोला रोहनप्रीतने कमेंट देऊन नेहाच्या होकाराला दूजोरा दिला आहे.

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You’re Mine @rohanpreetsingh #NehuPreet

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. कदाचित याच महिन्यात दिल्लीत त्यांचा विवाह होणार असल्याचे त्यात म्हटले होते. लग्न करण्याबाबत अद्याप त्या दोघांकडून अधिकृत कुठलेही माहिती पुढे आलेली नाही. सध्या बॉलीवूडमध्ये आघाडीची गायिका म्हणून नेहा आणि रोहनप्रीतचे नाव घेतले जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

EXCLUSIVE @nehakakkar and @rohanpreetsingh rokafied. FOLLOW : @bb14kakhabri @bb14kakhabri #rohanpreetsingh #nehakakkar #breakingnews #fyp #foryou #bollywood #singing

A post shared by Bigg Boss Updates By Khabri (@bb14kakhabri) on

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Neha Kakkar express her love for Rohan Preet Roka Ceremony photos on internet