सेटवर कलाकारांचं मद्यपान; 'द कपिल शर्मा शो'विरोधात एफआयआर

शोचे निर्माते अडचणीत सापडले आहेत.
Boycott Kapil Sharma is trending on twitter
Boycott Kapil Sharma is trending on twitter

'द कपिल शर्मा शो'च्या The Kapil Sharma Show निर्मात्यांविरोधात मध्य प्रदेशातील शिवपुरी इथल्या जिल्हा न्यायालयात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. शोमध्ये कोर्टात मद्यपान करतानाचा सीन दाखवल्याने निर्माते अडचणीत सापडले आहेत. सोनी टीव्हीवरील या कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये कलाकार मद्यपान करताना दाखवण्यात आलं होतं. कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी या शोविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

काय आहे वकिलांची मागणी?

शिवपुरीमधल्या एका वकिलाने सीजेएम कोर्टात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याबद्दल वकील म्हणाले, "सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो हा अत्यंत खालच्या दर्जाचा शो आहे. यामध्ये अनेकदा स्त्रियांबद्दल अश्लील टिप्पणी केले जातात. एका एपिसोडमध्ये, सेटवर कोर्टाचा सेटअप लावण्यात आला होता आणि त्यात कलाकारांना सार्वजनिकरित्या मद्यपान करताना दाखवण्यात आलं होतं. हा कोर्टाचा अपमान आहे. म्हणूनच मी कोर्टात कलम ३५६/३ अंतर्गत दोषींवर एफआरआर नोंदवण्याची मागणी केली आहे. अशा पद्धतीचं चित्रीकरण थांबवलं पाहिजे."

Boycott Kapil Sharma is trending on twitter
Bigg Boss Marathi 3: स्पर्धकांची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पहा भन्नाट मीम्स

नेमकं काय आहे प्रकरण?

१९ जानेवारी २०२० रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडवरून एफआय़आर दाखल करण्यात आला आहे. हाच एपिसोड नंतर २४ एप्रिल २०२१ रोजी पुर्प्रसारित करण्यात आला. कोर्टरूमच्या सेटमध्ये एक पात्र मद्यपी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे न्यायालयाचा अपमान झाला आहे, असा दावा वकिलांनी केला आहे.

कॉमेडियन कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' हा कार्यक्रम आहे. यामध्ये कपिलसोबतच सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी आणि अर्चना पुरण सिंग हे कलाकारसुद्धा आहेत. जवळपास सात महिन्यांच्या ब्रेकनंतर हा शो २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com