समुद्रकिना-यावरचा बोल्ड फोटो मिलिंदला भोवला; गोव्यात गुन्हा दाखल 

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 7 November 2020

पुनमवर सार्वजनिक जागेत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलिंदवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नेटकरी, आणि काही राजकीय व्यक्तींकडून करण्यात आली होती. अखेर मिलिंदवर गोव्यातील वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - जन्मदिनाच्या दिवशी चाहत्यांना 'सरप्राईज' देणा-या मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण याला समुद्रकिना-यावरील बोल्ड फोटो शुट भोवले आहे. त्यामुळे तो वादाच्या भोव-यात सापडला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोशल मीडियावर याविषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. यात काही सामाजिक कार्यकर्ते, लेखक यांनी भाग घेऊन मिलिंदवर टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री पुनम पांडे हिच्यावर सरकारी जागेत बोल्ड व्हिडीओ शुट केल्याप्रकरणी गोव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यानंतर पुनमवर सार्वजनिक जागेत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलिंदवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नेटकरी, आणि काही राजकीय व्यक्तींकडून करण्यात आली होती. अखेर मिलिंदवर गोव्यातील वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंदने त्याच्या वाढदिवसाबद्दल इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला होता. त्यावरुन वादाला तोंड फुटले. मिलिंद सोमण ५५ वर्षांचा झाला असून त्याने  ‘हॅप्पी बर्थ डे टू मी…#55’ , अशी कॅप्शन या फोटोला दिली होती. यात तो समुद्रकिनारी धावत आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर  त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.  यापूर्वीदेखील त्याने असाच एक बोल्ड फोटो शेअर केला होता.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday to me ! . . . #55 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

त्याच्या या फोटोच्या विरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन ६७ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिलिंद सोमणचा हा फोटो समोर आल्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली.

पूनमला पोलिसांनी घेतले ताब्यात; दोन जण निलंबित

याविषयी अधिक माहिती देताना गोवा सुरक्षा मंचाने सांगितले की, ‘मिलिंद सोमणनं सोशल मीडियावर बोल्ड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ त्यामुळे मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

 'पूनमच्या वाटयाला गुन्हा, मिलिंदचं कौतूक कशासाठी'?

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR against Milind Soman for his bold photoshoot on goa beach