पूनमला पोलिसांनी घेतले ताब्यात; दोन जण निलंबित

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 5 November 2020

पूनमला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कानकोण भागातील चापोली धरणावर बोल्ड शुटिंग केल्याप्रकरणी तिला ताब्यात घेण्यात आले असून तिच्या अटकेसाठी त्या गावातील नागरिकांनी गाव बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.

मुंबई- गोव्यातील एका सार्वजनिक ठिकाणी बोल्ड व्हिडीओ शुट केल्याप्रकरणी अभिनेत्री पूनम पांडेच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्या अशा प्रकारच्या कृत्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. या घटनेमध्ये वाढलेला राजकीय दबाब यामुळे अखेर तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या प्रकरणात दोन पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे.

गोव्यातील पाटबंधारेच्या एका सरकारी जागेत पूनमने बोल्ड शुट केले होते. ते व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. भाजपच्या आमदारांनी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. पूनम ही सध्या उत्तर गोव्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत असून तिला कलिंगुट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तिला काणकोण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 याविषयी अधिक माहिती देताना पोलीस अधिक्षक पंकज कुमार यांनी सांगितले, पूनमला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कानकोण भागातील चापोली धरणावर बोल्ड शुटिंग केल्याप्रकरणी तिला ताब्यात घेण्यात आले असून तिच्या अटकेसाठी त्या गावातील नागरिकांनी गाव बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.

गोव्यातील सरकारी जागेत सुरु होतं पुनमचं बोल्ड शुटिंग

याप्रकरणात पोलीस निरिक्षक तुकाराम चव्हाण आणि हवालदार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात राज्याच्या गृह विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. याअगोदर याच पोलीस ठाण्यात पूनमने आपला पती सॅम बॉम्बे याच्या विरोधात आपल्याला मारहाण करण्याची आणि विनयभंग करण्याची तक्रार नोंद केली होती. त्याच दरम्यान हा वादग्रस्त व्हिडिओही शूट झाला होता.

मिलिंद सोमणचं समुद्र किना-यावर 'बोल्ड' जॉगिंग

दोन महिन्यापूर्वी आपला हनिमून साजरा करण्यासाठी गोव्यात आलेल्या पूनमने काणकोण येथील चापोली धरणावर हा व्हिडिओ शूट केला होता. सध्या गोव्यात तो व्हायरल झाला आहे. या प्रकरणी काणकोणच्या एका स्थानिक युवकाने काणकोण पोलिसात तक्रारही दिली आहे. अशाप्रकारचा हा व्हिडीओ पाटबंधारे खात्याच्या मालकीच्या धरणावर कसा शूट केला गेला असा सवाल गोवा फॉरवर्डने प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी केला आहे.  

 
 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finally police arrested poonam pandey for bold shooting in goa