रणबीर कपूर स्टारर चित्रपटाचा सेटला आग, मोठी दुर्घटना टळली

fire at ranbir kapoor starrer luv ranjan film sets at chitrakoot studio andheri mumbai
fire at ranbir kapoor starrer luv ranjan film sets at chitrakoot studio andheri mumbai
Updated on

मुंबई : रणबीर कपूर स्टारर आणि चित्रपट निर्माते लव रंजन यांच्या अद्याप शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या सेटवर शुक्रवारी दुपारी आग लागली. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील चित्रकूट स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या सेटवर काम सुरू होते. स्टुडिओमधील हा सेट प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा होता, त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार प्री-लाइटिंग सुरू असताना हा अपघात झाला. लव रंजन हे येथे त्याच्या चित्रपटासाठी एक गाणे शूट करण्याचा विचार करत होते. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. त्याचवेळी अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लेव्हल 2 ची आग होती.

fire at ranbir kapoor starrer luv ranjan film sets at chitrakoot studio andheri mumbai
अंधेरीत सिनेमाच्या सेटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल

लव रंजन यांच्या ज्या सेटवर आग लागली त्याच्या शेजारी राजश्री प्रॉडक्शनचे दोन सेट होते. ही आग लगतच्या सेटपर्यंत पोहोचली. सनी देओलचा मुलगा आणि अभिनेता राजवीर देओलही येथे शूटिंग करत होते. आग इतकी भीषण होती की ती त्यांच्या सेटपर्यंत पोहोचली. दरम्यान या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आणि चित्रपटाचे शूटिंग थांबवून कलाकार-क्रूला घरी पाठवण्यात आले आहे.

fire at ranbir kapoor starrer luv ranjan film sets at chitrakoot studio andheri mumbai
Patra Chawl : संजय राऊतांविरुद्ध साक्ष देणाऱ्या महिलेला बलात्काराच्या धमक्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com