'लखनौ सेंट्रल'मधला कैदी किशन मोहन गिरहोत्रा सापडला

टीम ई सकाळ
सोमवार, 24 जुलै 2017

फरहान अख्तर सोशल साईटवर नेहमी अॅक्टीव असतो. ताज्या घडामोडींवर तो सतत भाष्य करत असतो. त्यामुळे त्याच्या ट्विटकडे लोकांचे लक्ष असते. आज मात्र त्याने किशन मोहन गिरहोत्रा या कैद्याचा फोटो सोशल साईटवर शेअर केला.

मुंबई : फरहान अख्तर सोशल साईटवर नेहमी अॅक्टीव असतो. ताज्या घडामोडींवर तो सतत भाष्य करत असतो. त्यामुळे त्याच्या ट्विटकडे लोकांचे लक्ष असते. आज मात्र त्याने किशन मोहन गिरहोत्रा या कैद्याचा फोटो सोशल साईटवर शेअर केला. हा दुसरा तिसरा कुणी नसून खुद्द फरहानच आहे. आगामी लखनौ सेंट्रल या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे नाव असून त्याचा तो फर्स्ट लूक आहे. 

याबद्दल फरहान लिहितो, हा आहे किशन मोहन गिरहोत्रा. याला सगळे 1821 म्हणतात. हा चित्रपट रणजीत तिवारी दिग्दर्शित करत असून, फरहानसह या चित्रपटात रोनित राॅय, डायना पेंटी अशी मंडळी आहेत. 

Web Title: Firest look of Lakhanau central esakal news