'बॅकवॉटर्स' : केरळमध्ये बेपत्ता झालेल्या लहान मुलाची रहस्यमय कथा

२००५ साली केरळमधून हरवलेल्या राहुल राजू या सात वर्षीय लहान मुलाचा शोध अजूनही लागलेला नाही.
Backwaters movie poster
Backwaters movie poster

अंकित चंदिरामणि यांचे 'सनशाईन स्टुडिओज' वितरण क्षेत्रात कायमच आघाडीवर राहिले. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपटांचे वितरक म्हणून आणि तब्ब्ल ७०हुन अधिक मराठी चित्रपटांचे वितरक आणि प्रस्तुतकर्ते म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत आपले नाव कमावले. आता नव्याने 'सनशाईन स्टुडिओ' केरळमध्ये हरवलेल्या मुलावर आधारित एका नव्याकोऱ्या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यात 'सनशाईन स्टुडिओ' हे 'सुनिल जैन प्रॉडक्शन' (एसजेपी) आणि आशिष अर्जुन गायकर यांचे (एजीएफएस) यांच्यासह बाल तस्करी आणि हरवलेल्या मुलांच्या रहस्यमय जगात डोकावणाऱ्या या आशयघन आणि रहस्यमय चित्रपटाची निर्मिती करून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या थ्रिलरला 'बॅकवॉटर्स' हे नाव एफटीआयआयचे पदवीधर आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव ठाकूर यांनी दिले आहे.

'सनशाईन स्टुडिओ' ही वितरक कंपनी पहिल्यांदाच निर्मितीक्षेत्राकडे तिची पाऊले उचलत आहे. बऱ्याच नावाजलेल्या हिंदी चित्रपटांचे वितरक म्हणून आणि मराठी चित्रपटात वितरक आणि प्रतुतकर्ते म्हणून उत्तम कामगिरी केली. तब्बल ३०० हुन अधिक चित्रपटांचा अनुभव गाठीशी बाळगून ही कंपनी नव्याने निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. एक वितरक म्हणून कायमच ही कंपनी सिनेसृष्टीत अग्रस्थानी होती. बॉलिवूड आणि मराठीच नव्हे तर हॉलिवूड चित्रपटाचे वितरण करून या कंपनीने चित्रपटसृष्टीत स्वतःचा दरारा निर्माण केला.

हेही वाचा : पूजा सावंत ते प्राजक्ता माळी.. मराठी अभिनेत्रींचं साडीतील सौंदर्य

'सुनील जैन प्रॉडक्शन' (एसजेपी) ने अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री इसाबेल कैफ यांच्या 'क्वाथा' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. याशिवाय एका वेबसिरीज आणि अनेक चित्रपटांच्या निर्मितीतून प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

२००५ साली केरळसारख्या देवांची भूमी मानल्या जाणाऱ्या शहरातून हरवलेल्या राहुल राजू या सात वर्षीय लहान मुलाचा शोध अजूनही लागलेला नाही, आज राहुल कुठे आहे हा प्रश्न आजही त्याच्या पालकांना सतावत आहे. राहुल प्रमाणे आजही कित्येक मुले बेपत्ता झाली असतील आणि त्यांचा शोध कशाप्रकारे घेतला जाईल यावर आधारित चित्रपट करणे म्हणजे एक टास्कच आहे. कारण ही सिरीज म्हणजे अपहरण सारख्या गंभीर विषयात डोकावणेच होय. मात्र अशा जिवंत घटना लोकांसमोर येणे ही तितकेच आवश्यक आहे. या सिरीजमध्ये दिल्ली थिएटर अभिनेता सरताझ खरे हा सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे. तर युकेची मॉडेल नीता परानी ही एकाच वेळी अनेक तथ्यांच्या शोधात असणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस केरळमधील अलाप्पूझा येथे चित्रित करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com