#SamManekshaw : भारदस्त माणेकशाँच्या पेहरावातील विकीचा लूक बघितला का?

टीम ईसकाळ
Thursday, 27 June 2019

भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम' या चित्रपटात विकी हा माणेकशॉ यांच्या मुख्य भूमिकेत दिसेल. हा चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असल्याने पुन्हा एकदा 'राझी' सारखी उत्तम कलाकृती बघायला मिळणार आहे.

विकी कौशलचा सॅम माणेकशॉ यांच्या पहरावातील एक फोटो आज व्हायरल झालाय... तर हा फक्त फोटो नसून विकी पुन्हा एकदा तगडी भूमिका करायला सज्ज आहे. भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम' या चित्रपटात विकी हा माणेकशॉ यांच्या मुख्य भूमिकेत दिसेल. हा चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असल्याने पुन्हा एकदा 'राझी' सारखी उत्तम कलाकृती बघायला मिळणार आहे. आज माणेकशॉ यांची पुण्यतिथी असल्याने हा लूक शेअर केल्याचे समजते.  

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये माणेकशॉ यांच्या एका प्रसिद्ध फोटोप्रमाणे विकी टेबलासमोर बसलेला आहे. भारतीय लष्कराचा पोशाख, स्मितहास्य, रूबाबदार मिशा अशा लूकमध्ये विकी अगदी माणेकशाँसारखा दिसत आहे. त्यामुळ पुन्हा एकदा त्याच्या या भारदस्त लूकची चर्चा सर्वत्र होत आहे. विकीने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत, 'मला पुन्हा एकदा निर्भीड देशभक्ताची भूमिका साकारायला मिळतीये याचा मला अभिमान आहे. त्याचबरोबर आज मी भावूक झालोय. आज त्यांच्या स्मृतिदीन आहे व आज मी एक नवीन सुरवात करतोय,' अशी प्रतिक्रीया दिली आहे.

मेघना गुलजार व विकी कौशल ही जोडी या निमित्ताने पुन्हा एकत्र येण्यासाठी सज्ज आहे. रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 2021 मध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरू होईल. 1971 मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून देणाऱ्या माणेकशॉ यांच्यावरील चित्रपटाकडे आणि विकीच्या अभिनयाकडे चाहते पुन्हा एकदा डोळे लावून बसले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first look of Vicky Kaushal as a Sam Manekshaw gets viral