
Flora saini : 'त्यानं माझ्या चेहऱ्यावर अन् गुप्तांगावर...' अभिनेत्री फ्लोराचा धक्कादायक खुलासा
Flora saini viral video : फ्लोरा सैनीचा बोल्डनेस आणि हॉटनेस एव्हाना सोशल मीडियावर अनेकांना चांगलाच परिचयाचा झाला आहे. तिनं भलेही सुरुवात बोल्डनेस व्हिडिओपासून सुरुवात केली असेल मात्र आता ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. सध्या तिचा एक खुलासा हा चर्चेत आला आहे.
ज्यांनी गंदी बात, सिटी ड्रीम्स सारख्या मालिका आणि अंडरवेअरसारखी शॉर्ट फिल्म्स पाहिल्या असतील त्यांना फ्लोरा कोण आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच की काय फ्लोरा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आता तिनं आपल्याला चित्रपटामध्ये काम देतो या अमिषानं एका दिग्दर्शकानं फसविल्याचा आऱोप केला आहे.
Also Read - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ
फ्लोरानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. यात तिनं आपल्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराविषयी सांगितले आहे. ते ऐकून तिच्या चाहत्यांना तर मोठा धक्काच बसला आहे. आपण ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रेम केले त्याच व्यक्तीनं आपला गैरफायदा घेतला आणि आपल्यावर १४ महिने अत्याचार केल्याचे फ्लोरानं म्हटले आहे.
खरं तर यापूर्वी फ्लोरानं मी टू चळवळीमध्ये सहभाग घेऊन तिच्याबाबत घडलेल्या गोष्टींना वाचा फोडली होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मी खरं तेव्हा माझ्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत होते. माझं वय २० वर्षे असेल. त्याचवेळी माझ्याकडून नको त्या गोष्टी घडल्या. एका दिग्दर्शकाच्या प्रेमात पडले. पण मला माहिती नव्हतं की, पुढे काय होणार आहे, तो मला रोज मारहाण करायचा. त्यानं मला नको त्याठिकाणी मारहाण केल्याचा आरोप फ्लोरानं यावेळी केला आहे.
ज्याच्यावर मी एवढं मनापासून प्रेम केले त्यानं मला अशाप्रकारे वागवणे हे माझ्यासाठी धक्कादायक होते. सतत मारहाण करणे, अपमानकारक शब्द वापरणे यामुळे मानसिक त्रास झाला. मी शेवटी माझ्या आईवडिलांकडे निघून गेली. तो काळ माझ्यासाठी खूपच वेदनादायी होता. आता मी जगाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला शिकले आहे. असं फ्लोरानं म्हटले आहे.