विदेशी अभिनेत्री लीझानची मराठीत एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मराठी सिनेइंडस्ट्रीने सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यात आता विदेशी अभिनेत्री लीझान मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करीत आहे. ती कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चाहूल’ मालिकेत जेनिफर या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता अक्षर कोठारी दिसणार आहे. ‘चाहूल’ मालिकेत एक गूढ रहस्याचा उलगडा होणार आहे. उच्च शिक्षणासाठी गेलेला सर्जेराव भोसले एका दशकानंतर सातारा जिल्ह्यातील भवानीपूर या त्याच्या मूळ गावी परततो. तो त्याच्या होणाऱ्या बायकोसह म्हणजेच परदेश वास्तव्यादरम्यान भेटलेल्या जेनिफरसह भवानीपूरमध्ये येतो.

मराठी सिनेइंडस्ट्रीने सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यात आता विदेशी अभिनेत्री लीझान मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करीत आहे. ती कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चाहूल’ मालिकेत जेनिफर या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता अक्षर कोठारी दिसणार आहे. ‘चाहूल’ मालिकेत एक गूढ रहस्याचा उलगडा होणार आहे. उच्च शिक्षणासाठी गेलेला सर्जेराव भोसले एका दशकानंतर सातारा जिल्ह्यातील भवानीपूर या त्याच्या मूळ गावी परततो. तो त्याच्या होणाऱ्या बायकोसह म्हणजेच परदेश वास्तव्यादरम्यान भेटलेल्या जेनिफरसह भवानीपूरमध्ये येतो. सर्जेराव आणि जेनिफर यांच्या प्रेमात व लग्नात एका अज्ञात शक्तीमुळे अडथळे येऊ लागतात आणि मग एका गूढ शोधाचा प्रवास सुरू होतो, यावर आधारित मालिकेची कथा आहे.

Web Title: foreign actress lijhan entry in marathi movie