'टॉय स्टोरी'चा चौथा भाग आणखी लांबणीवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

लंडनः तब्बल 180 अब्ज डॉलर्स कमावलेल्या 'टॉय स्टोरी' चित्रपटाचा चौथा भाग अधिक कल्पक असेल, असे ऑस्कर विजेता हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्स याने म्हटले आहे. 

'टॉय स्टोरी 4'च्या टीमला कल्पकतेने चौथा भाग काढायचा आहे. त्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे, असे हँक्सने सांगितले. या चित्रपटाच्या आधीच्या तिन्ही भागातील प्रमुख व्यक्तिरेखा असलेल्या 'वुडी'ला हँक्सचा आवाज आहे. 

'टॉय स्टोरी' अॅनिमेशनपटाने जगभरातील चित्रपट रसिकांना भुरळ घातली आहे. चित्रपटाचा चौथा भाग 2017 मध्ये प्रदर्शित होईल, असे आधी डिस्ने-पिक्सार या निर्माता संस्थेने घोषित केले होते. त्यानंतर 2018 पर्यंत चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. सध्याच्या माहितीनुसार, चित्रपट जून 2019 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 'द इन्क्रेडिबल्स' या हीट अॅनिमेशनपटाच्या नव्या भागांच्या निर्मितीमध्ये डिस्ने-पिक्सार गुंतले आहे. 

'चित्रपट मुळातच खूप छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये दीर्घकाळ बनत असतो. अॅनिमेशनपटासाठी तुमच्या हातात काही संवाद असतात. ते घेऊन तुम्ही स्टुडिओत जाता आणि त्यावर प्रयोगांवर प्रयोग करता..त्यातून एकापाठोपाठ एक कल्पना जन्माला येतात,' अशा शब्दांत हँक्सने अॅनिमेशनपट निर्मितीबद्दलची स्वतःची भावना मांडली. हँक्स लंडनमध्ये त्याच्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त आला होता. 

'मला माझ्या व्यक्तिरेखेबद्दल कमालीची उत्सुकता आहे. 'वुडी'चा प्रवास नेमका कसा होणार आहे, हे मलाही जाणून घ्यायचेय,' असे त्याने 'टॉय स्टोरी 4'बद्दल सांगितले. 

Web Title: Fourth part of Toy Story delayed