
'प्रसिद्धी मिळूनही इतका साधा कसा?'; 'देवमाणूस' किरणसाठी मित्राची पोस्ट
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' Devmanus या मालिकेतून अभिनेता किरण Kiran Gaikwad गायकवाड घराघरात पोहोचला. किरणची भूमिका जरी नकारात्मक असली तरी या मालिकेमुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. मालिकेत देवमाणसाच्या चेहऱ्यामागे सीरिअल किलर असलेला डॉ. अजितकुमार खऱ्या आयुष्यात कसा आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. नुकतंच किरणच्या एका मित्राने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने किरणचं भरभरून कौतुक केलं आहे. (friends hearth touching post for devmanus fame actor kiran gaikwad)
किरणसाठी मित्राची पोस्ट-
'इंडस्ट्रीचं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना, एक साधा मुलगा झी मराठीचा 'देवमाणूस' होऊ शकतो. फक्त हिरो + विलन होऊन तो थांबत नाही, तर झी चे तीन-तीन अवॉर्ड्स घेतो आणि त्याच्या या यशाबद्दल त्याला काही विचारलं तर तो म्हणतो, ही तर सुरुवात आहे आपली. अजून खूप काही करायचंय एक्का. नेहमी प्रोग्रेसिव्ह विचारांनीच कसा बोलत असेल हा? सगळं पॉझिटिव्हच बोलणं कसं असतं याचं? याला अगदी कुठल्याही परिस्थितीत असं इतकं शांत कसं राहता येतं आणि गोष्टी इग्नोर कशा करता येतात? इतक्या प्रसिद्धीनंतरही इतकं साधं कसं राहता येतं? असे कितीतरी प्रश्न पडतात मला. एका मोठ्या दिग्दर्शकाने मला सांगितलं होतं की, कलाकार अंदर से जितना शांत रहता है, उसका पात्र बाहर उतनीही ताकत से तबाही मचाता है. हे वाक्य तुझ्याकडे बघून १०० टक्के खरं सिद्ध होतं भावा. मला आणि माझ्यासारख्या खेड्यापाड्यातून, चिखला-मातीतून येणाऱ्या असंख्य कलाकारांना स्वप्न बघायला बळ मिळतं तुझ्यामुळे. मागच्या वर्षभरात खूप काही शिकलोय तुझ्याकडून. आता ते शांत राहणं आणि गोष्टींकडे दुर्लक्ष करणं तेवढं शिकव बाबा एकदा, म्हणजे माझा अभ्यासक्रम पूर्ण होईल,' अशी पोस्ट अभिनेता एकनाथ गितेने लिहिली.
हेही वाचा: 'ही' मालिका ठरली महाराष्ट्राची नंबर १ मालिका
हेही वाचा: आजोबा अरुण गवळी नातीच्या भेटीला; फोटो व्हायरल
देवमाणूस या मालिकेत रेश्माच्या पतीची भूमिका एकनाथ साकारतोय. या पोस्टसोबतच एकनाथने किरणसोबतचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.
Web Title: Friends Hearth Touching Post For Devmanus Fame Actor Kiran
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..