'समाजसेवेचं एक पर्व संपलं'; मराठी कलाकारांनी सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली | Sindhutai Sapkal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi actors expressed grief over Sindhutai Sapkal's demise

'समाजसेवेचं एक पर्व संपलं'; मराठी कलाकारांनी सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली

अनाथांची माय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या निधनानंतर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाविश्वातील मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित माईंना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री स्पृहा जोशीने माईंसाठी कविता लिहिली आहे. तर 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडितने भावूक पोस्ट लिहिली आहे.

'असेच होते.. पदर तिचा मायाळू अजुनी मला सोडवत नाही. ती नाही.. हा विचारसुद्धा मला सोसवत नाही. वाटायचे अनेकदा मी मोठी झाली आहे. मात्र एकटेपणा घराचा मुळी साहवत नाही..', कवितेतील अशा शब्दांतून स्पृहा व्यक्त झाली. अभिनेता प्रसाद ओक, सुबोध भावे, स्वप्निल जोशी, हेमंत ढोमे यांनीसुद्धा शोक व्यक्त केला. 'पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा, सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ आज आपल्यात नाहीत. खरंच दु:खद घटना. त्यांच्या आजवरच्या महान कार्याला मानाचा मुजरा, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना', अशा शब्दांत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने श्रद्धांजली वाहिली. 'समाजसेवेचं एक पर्व संपलं', असं रेणुका शहाणे यांनी लिहिलं.

हेही वाचा: 'घाईघाईने RIP लिहिण्याच्या या जगात..'; सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीची विनंती

सिंधुताई सपकाळ ४० वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या. अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. नकोशी असलेली मुलगी म्हणून त्यांना चिंधी या नावाने ओळखलं जात होतं. मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकलेल्या सिंधुताईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. वैवाहिक आयुष्यातील संघर्षानंतर त्यांनी अनाथ मुलांसाठी काम करण्याचा वसा घेतला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top