Fukrey 3 Trailer : 'अपना राजा अकल से अंधा है भाई'! 7 वर्षांनी 'फुकरे 3' आला, डायलॉग तर एकदम सही...

गेल्या काही दिवसांपासून फुकरे ३ या चित्रपटाची चर्चा आहे. कॉमेडी आणि सस्पेन्स या प्रकारातील चित्रपटानं प्रेक्षकांची मोठी पसंतीही मिळवली होती.
Fukrey 3 Trailer
Fukrey 3 Traileresakal

Fukrey 3 Trailer Video : बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले त्या फुकरे नावाच्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून फुकरे ३ या चित्रपटाची चर्चा आहे. कॉमेडी आणि सस्पेन्स या प्रकारातील चित्रपटानं प्रेक्षकांची मोठी पसंतीही मिळवली होती. रिचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, पुलकित सम्राट, यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये होता.

खासकरुन तरुणाईच्या पसंतीस हा चित्रपट पडला होता. आता त्याच्या तिसऱ्या भागाचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. पोस्टरसोबतच त्यांनी रिलिज डेटचीही घोषणाही केली आहे. २ मिनिटे आणि ५१ सेकंदाच्या त्या व्हिडिओनं चाहत्यांना खूश केले आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

तो ट्रेलर तुम्हाला पुन्हा दहा वर्षे मागे नेल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या भागात चूचा आणि हन्नीभाईची सुरुवात शाळेपासून होते. त्यात ते पहिल्यापासून फेल होत असल्याचे दिसून आले होते. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. आता प्रेक्षकांना नव्या चित्रपटामध्ये काय पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे.

फुकरेचा पहिला भाग हा २०१३ मध्ये आला होता. त्यानंतर त्याचा दुसरा भाग २०१७ आला होता. आता पाच वर्षांनंतर त्याचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Fukrey 3 Trailer
Jawan Review: एंटरटेनमेंटचं धमाकेदार पॅकेज, कसा आहे शाहरुखचा जवान? पहिला रिव्ह्यू आला समोर

बॉलीवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहेत. त्यात बड्या कलाकारांचे चित्रपट देखील आहे. दोन दिवसांनी किंग खान शाहरुखचा जवान प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची उत्सुकता आहे. त्यात विनोदी, क्राईम, सस्पेन्स विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे.

दुसरीकडे बॉलीवूडबरोबरच टॉलीवूडमध्ये देखील बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात अल्लू अर्जूनच्या पुष्पा या बहुचर्चित चित्रपटाची प्रतिक्षा चाहत्यांना आहे. याशिवाय आणखीही प्रलंबित प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com