Gadar 2: तारा- सकीनाच्या लव्हस्टोरीत नाना पाटेकरांची एन्ट्री! कोणत्या भुमिकेत करणार 'गदर'?

Gadar 2
Gadar 2Esakal

Gadar 2 : गेल्या काही दिवासांपासून मनोरंजन विश्वात गदर 2 ची चर्चा आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि गाणं नुकतच रिलीज करण्यात आली आहे.

रिलीजपूर्वी आता या चित्रपटाबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता या चित्रपटात आणखी एका दिग्गज अभिनेत्याची एंट्री झाली आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेल हे कलाकार मुख्य भूमिकेत असतांना आता या चित्रपटात स्टार कास्टमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे देखील सामिल झाले आहेत.

आता नाना पाटेकर या चित्रपटात कोणत्या भुमिकेत असणार असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. तर नाना पाटेकर या चित्रपटात अभिनय करतांना दिसणार नाही आहेत.

Gadar 2
Saisha Bhoir News: आई - वडिलांच्या वादाचा लेकीला फटका...साईशाला मालिकेतून काढलं, या बालकलाकाराने घेतली जागा

नाना पाटेकर हे कुण्या भुमिकेतुन नव्हे तर त्याच्या आवाजाने चित्रपटात आपली उपस्थीती देणार आहेत. तरण आदर्श यांनी एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये नाना पाटेकर हे व्हॉइस ओव्हर देतांना दिसत आहे.

"नाना पाटेकर यांनी 'गदर 2'साठी व्हॉईस ओव्हर केला आहे... नाना पाटेकरांनी 'गदर 2'साठी आवाज दिला आहे... चित्रपटाच्या सुरुवातीलाच नानाचा आवाज असणार..ते प्रेक्षकांना गदर2 ची ओळख करून देईन." असं कॅप्शन देत त्यांनी नाना पाटेकर यांच्या भुमिकेबद्दल खुलासा केला आहे.

2001 सालच्या गदरने पुर्ण मनोरंजन विश्वात गोंधळ घातला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. पहिल्या गदरला ओम पुरी यांनी आपला आवाज दिला होता, ते आज या जगात नाहीत. आता गदर 2 मध्ये त्यांच्या जागी नाना पाटेकर आपल्या दमदार आवाजाने चित्रपटाला आणखी दमदार बनवणार आहेत.

Gadar 2
Satya Prem Ki Katha: महाराष्ट्राचं राजकारण मनोरंजक झालेलं असतांना कार्तिक कियाराच्या चित्रपटाच्या कमाईत जबरी वाढ!

अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'गदर' हा चित्रपट 2001 साली आला होता आणि आता 22 वर्षांनंतर 2023 साली 'गदर 2' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. उत्कर्ष शर्मा 'गदर' चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेलसोबत दिसला होते.

आता पुन्हा एकदा अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा सनी देओल हे या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यातच आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचाही सामावेश झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com