तर 'गदर' मध्ये सनी देओल नसताच..'या' बड्या अभिनेत्यानं स्क्रिप्टवर शंका व्यक्त करत कळवलेला नकार.. Gadar 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gadar 2

Gadar 2: तर 'गदर' मध्ये सनी देओल नसताच..'या' बड्या अभिनेत्यानं स्क्रिप्टवर शंका व्यक्त करत कळवलेला नकार..

Gadar 2: 15 जून 2001 ला 'गदर एक प्रेम कथा' सिनेमा रिलीज झाला होता, ज्यामध्ये सनी देओल,अमरीश पुरी,अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा लीड रोलमध्ये होते. सिनेमाला लोकांकडून खूप प्रेम मिळालं आणि सिनेमा सुपरहिट राहिला.

सिनेमात एका अशा व्यक्तीची कहाणी दाखवली होती जो आपलं प्रेम मिळवण्यासाठी थेट पाकिस्तान गाठतो आणि तिथे सगळ्यांनाचा सळो की पळो करून सोडतो. तब्बल २२ वर्षानंतर सिनेमाचा सीक्वेल आता आपल्या भेटीस येत आहे.

सिनेमाला पुन्हा एकदा अनिल शर्मा यांनीच दिग्दर्शित केलं आहे. 'गदर २' च्या रिलीज आधी थोडं याच्या पहिल्या भागाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

गदर सिनेमाच्या रिलीजवेळी मल्टिप्लेक्सचं वातावरण नव्हतं..सिंगल स्क्रीन थिएटर्समध्येच सिनेमाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. त्यावेळी परिस्थिती अशी होती ती तिकीट्स संपायच्या पण लोकांच्या रांगा मात्र लांबच्या लांब लागलेल्या असायच्या तिकीट बारीसमोर.

खूप महिने सिनेमा हाऊसफुल्ल होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार सकाळी ३ वाजता शो सुरू केला जायचा आणि त्यावेळी लोक थिएटरमध्ये सीटवरच नाही तर जमिनीवर बसून,थिएटरमध्ये उभं राहून देखील सिनेमा पहायचे.

आता यात हैराण करणारी गोष्ट ही आहे की त्यावेळी 'गदर' सिनेमाला अनेक समिक्षकांनी फ्लॉप म्हटलं होतं.

एका समिक्षकेत तर सिनेमासाठी लिहिलं गेलं होतं-'गटर- एक प्रेम कथा'(Gadar Eak Prem Katha sunny deol was not first choice of gadar)

बोललं जातं की 'गदर' सिनेमासाठी पहिली पसंती सनी देओल नाही तर गोविंदा होता. पण दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नेहमीच ही उगाच अफवा पसरवली असं म्हटलं. अनिल शर्मा यांनी म्हटलं होतं की गोविंदाला कधीच या सिनेमासाठी साइन केलं नव्हतं.

पण अशीही बातमी समोर आली होती की, अनिल यांनी 'महाराजा'च्या सेटवर गोविंदाला गदर सिनेमाची स्क्रीप्ट ऐकवली होती. जी ऐकल्यानंतर गोविंदा घाबरला होता. गोविंदाचं म्हणणं होतं की एवढ्या मोठ्या स्केलवर हा सिनेमा कसा बनेल? आणि त्यातही पाकिस्तानचा सेट भारतात उभारणं..त्यावेळी खूप कठीण होतं.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

'गदर'चं शूटिंग तब्बल सव्वा वर्ष चाललं ते सनी देओल मुळे. सिनेमात सनी देओलला खूप काळासाठी दाढी लांब ठेवावी लागणार होती..पण तो ब्रेक घेऊन दुसरा सिनेमा शूट करण्यासाठी गेला होता..ज्यामध्ये त्याला क्लीन शेव ठेवावी लागत होती.

त्यामुळे क्लीन शेव आणि मग दाढी परत वाढवण्यात तेवढा वेळ वाया गेला होता. ज्यामुळे 'गदर' सिनेमाच्या शूटिंगचा कालावधी वाढला. शूट व्यतिरिक्त हे देखील बोललं जात होतं की अनिल शर्मा आणि सनी देओल दरम्यान यांच्यात पैज लागली होती की जर सिनेमाच्या प्रीमियरला चांगला रीस्पॉन्स मिळाला तर दोघंही दारुची जंगी पार्टी करतील.

सिनेमा सुपरहिट झाला आणि खूप पार्ट्या झाल्या. दारु न पिणाऱ्या सनी आणि अनिल यांनी त्यावेळी थोडंसं मद्यप्राशन केलं होतं.