esakal | रोहित राऊतची ‘गजर तुझा मोरया’तून गणरायाची आराधना
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित राऊतची ‘गजर तुझा मोरया’तून गणरायाची आराधना

रोहित राऊतची ‘गजर तुझा मोरया’तून गणरायाची आराधना

sakal_logo
By
युगंधर ताजणे

आपल्या आवाजानं महाराष्ट्रातील श्रोत्यांना वेड लावणाऱ्या रोहित राऊतचं एक नवं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. गजर तुझा मोरया असं त्या गाण्याचं नाव आहे. त्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नादखुळा म्युझिक लेबल यांनी हे गाणं गणेश भक्तांसाठी तयार केलं आहे. त्या निर्मिती संस्थेनं यापूर्वी आपली यारी या गाण्याची निर्मिती केली होती. निखील नमीत आणि प्रशांत नाकती यांची निर्मिती असलेलं आणि सचिन कांबळे दिग्दर्शित गजर तुझा मोरया हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. गजर तुझा मोरया हे गीत लिहून त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केलं आहे, कुणाल करणने तर रोहित राऊतने हे गाणे गायले आहे.

निर्माते प्रशांत नाकती म्हणतात, “संगीत दिग्दर्शक कुणाल-करण जोडीसोबत गायक रोहित राऊतची भट्टी खूप चांगली जमते. गजर तुझा मोरया ह्या गाण्यातही तुम्हांला याची अनुभूती येईल. यंदा महाराष्ट्राने कोरोनासह महापूराच्याही नैसर्गिक संकटाला तोंड दिले आहे. सर्व संकटातून वाट काढताना विघ्नहर्त्याचा धावा करणा-या प्रत्येक भक्ताची भावना ह्या गाण्यातून प्रतीत होत आहे.” दिग्दर्शक सचिन कांबळे म्हणतात,”महापूरातल्या अनेक कुटूंबांची प्रातिनिधीक कथा गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे घराघरात गणेश आराधनेत ऐकलं जाईल, अशी आशा आहे."

संगीत दिग्दर्शक कुणाल-करण यांनी आजवर अनेक टीव्ही मालिका, अॅड-फिल्म्सना संगीत साज चढवला आहे. कुणाल-करण म्हणतात,”आमचं घर कोकणात असल्याने यंदा कोकणासह महाराष्ट्राला पावसाने जे झोडपलंय त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे ह्या गाण्याचे बोल आणि स्वरसाज हृदयातून उमटलेला आहे. रोहितने गायलेले हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, असं मला वाटतं.” गायक रोहित राऊत म्हणतो,”कुणाल-करणच्या संगीतामध्ये एक जादू आहे.गजर तुझा मोरया तुम्हांला भक्तीरसात लीन करेल. याची खात्री आहे. नादखुळा म्युझिकसोबत माझं हे पहिलं गाणं आहे. या अगोदरची नादखुळा म्युझिकची दोन्ही गाणी कानसेनांच्या पसंतीस पडली आहेत. त्यामुळे हे ही गाणे सर्वांना आवडेल, अशी मला आशा आहे.”

हेही वाचा: नॉर्वे बॉलिवूड फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळा 'मीडियम स्पाइसी'

हेही वाचा: 'मी भारी की जॅकलीन', यामीच्या प्रश्नाला माधुरीनं दिलं उत्तर

loading image
go to top