esakal | 'तष्ट'चा रशियात महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh festival news

'तष्ट'चा रशियात महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

पुणे: गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्त तयार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु होती. ती शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यानिमित्तानं सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार झाल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच रशियातील पहिल्या पावसाच्या सरींसोबत गणरायाचं आगमन, आरती, मिरवणूक, अस्सल मराठमोळे शिवकालीन पारंपरिक पोशाख असा दिमाखदार महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर सोहळा नुकताच मॉस्को शहरात पार पडला. रशियन संस्कृती आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अनोखा मिलाफ यावेळी पाहायला मिळाला. 'रॉयल तष्ट'च्या वतीनं या संस्कृतीची आदान प्रदान करणाऱ्या अनोख्या सोहळ्याचं सादरीकरण करण्यात आले. रशियातील 'एक्झिटो' या मीडिया कंपनीने 'तष्ट' ला आपली कला सादर करण्यास आमंत्रित केले होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'रॉयल तष्ट'च्या वतीनं आपली संस्कृती, कला याचे सादरीकरण रशियाची राजधानी मॉस्को शहरात करण्यात आले. यावेळी 22 जणांच्या टीम सोबत 'रॉयल तष्ट'चे संचालक दीपक माने, क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार, शो कॉर्डिनेटर अभिनंदन देशमुख आदी सहभागी झाले होते. या दौऱ्यातील अनुभवा बद्दल बोलताना 'रॉयल तष्ट'चे क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार म्हणाले, या दौऱ्यातील अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. आपली संस्कृती त्यांना समजावून सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटला. रशियातील लोकांना मराठी किंवा इंग्रजी कळत नाही. पण त्यांना आपल्या ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृती बद्दल खूप आकर्षण आहे. पहिल्या दिवशी आम्ही गणेशोत्सवावरील नृत्य सादरीकरण केले. त्यात अनेक रशियन नागरिक स्वतःहून सहभागी झाले. मराठी गाणी त्यांना खूप आवडली. गणपती आरतीची त्यांना भूरळ पडली. त्यांनी या आरतीचा अर्थ भाषांतरीत करून घेतला आणि म्हणण्याचा देखील प्रयत्न केला. अल्बट स्ट्रीट येथे गणेशोत्सव सादर करण्यात आला.

हेही वाचा: ऑनलाइन पद्धतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

हेही वाचा: मातीचा गणपती कसा ओळखाल? वाचा भन्नाट टिप्स

या उत्सव सोहळ्यामध्ये आरती, मिरवणूक सादर करण्यात आली. त्यात अनेकांनी सहभाग घेतला होता. दुसऱ्या दिवशी मॉस्को शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 'शिवजातस्य' नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यालाही उपस्थितांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आगामी काळात एक्झिटो' नं दुबईत कला सादर करण्याचं निमंत्रण दिल्याचेही पवार यांनी सांगितले.

loading image
go to top